इन्स्टाग्राम लाईव्ह संपल्यानंतर कॅमेरा बंद करायला विसरला अन्...शाहिदच्या सावत्र भावाची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:19 PM2023-08-09T14:19:59+5:302023-08-09T14:21:42+5:30

तो विसरला की लाईव्ह सुरु आहे आणि....

ishaan khatter forgot to put camera off after instagram live realised after sometime | इन्स्टाग्राम लाईव्ह संपल्यानंतर कॅमेरा बंद करायला विसरला अन्...शाहिदच्या सावत्र भावाची अवस्था

इन्स्टाग्राम लाईव्ह संपल्यानंतर कॅमेरा बंद करायला विसरला अन्...शाहिदच्या सावत्र भावाची अवस्था

googlenewsNext

शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) सावत्र भाऊ ईशान खट्ट्ररने (Ishan Khatter) 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तो आपल्या अभिनयातून बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करतोय. मोठा भाऊ शाहीद कपूरच्या पावलावर पाऊल ठेवतच त्याने सिनेसृष्टीत एंट्री घेतली. मात्र भावासारखी लोकप्रियता त्याला अजून मिळालेली नाही. नुकतंच ईशानने इन्स्टाग्रामवर लाईव्ह केलं. मात्र लाईव्ह संपल्यानंतर तो कॅमेरा बंद करायचा विसरला. त्यानंतर जे घडलं ते सध्या चर्चेत आहे.

ईशानने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. अनेक विषयांवर त्याने चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. याचवेळी त्याला दुबईतून एका इव्हेंटचे आमंत्रण मिळाले. तो ते लेटर उघडत होता आणि सोबत बसलेल्या मित्रासोबत बोलत होता. याचवेळी तो विसरला की लाईव्ह सुरु आहे आणि 'शीट..' असं म्हणत तो कॅमेरा बंद करायला आला. यानंतर त्याचे हावभाव बघण्यासारखे होते.

ईशानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडिओ पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणलं आहे. कारण ईशानला मिळालेलं आमंत्रण हे 'टीव्हीएस(TVS)' कंपनीकडून आलेलं आहे. त्यात तो TVS बाबतच मित्राशी बोलताना दिसतोय. त्यामुळे ईशानने TVS साठीच हा प्रमोशनल स्टंट केल्याचं नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे. तर काही जणांनी ईशानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. 'हा तर ऑफ कॅमेराही किती वाईट अभिनय करतो','भावाने इथेही खराब अॅक्टिंग केली आहे' अशा कमेंट्स करत त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

ईशान खट्ट्रर लवकरच कृष्ण मेमन यांच्या 'पिप्पा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये मृणाल ठाकुर, प्रियांशु पेनयुली आणि सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत. तसंच ईशानचा नुकताच 'फोन भूत'  हा सिनेमा रिलीज झाला होता. सिद्धांत चतुर्वेदी आणि कतरिना कैफ यांच्यासोबत त्याने स्क्रीनशेअर केली. मात्र हा सिनेमा फारसा चालला नाही.

Web Title: ishaan khatter forgot to put camera off after instagram live realised after sometime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.