'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरने दिला खास संदेश, हातात तिळगुळाचे लाडू दाखवत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:42 IST2026-01-14T16:42:18+5:302026-01-14T16:42:43+5:30

ईशा कोप्पीकरचा व्हिडीओ पाहिलात का?

isha koppikar wishes everyone happy makar sankranti also gives advice to all people | 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरने दिला खास संदेश, हातात तिळगुळाचे लाडू दाखवत म्हणाली...

'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरने दिला खास संदेश, हातात तिळगुळाचे लाडू दाखवत म्हणाली...

बॉलिवूडमध्ये 'खल्लास गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ईशा कोप्पीकर महाराष्ट्रीय कुटुंबात जन्माला आली आहे. ईशाचे मराठी तसंच हिंदीतही अनेक चाहते आहेत. आज मकर संक्रांतीनिमित्त तिने शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. सकारात्मक विचार आणि जीवनमूल्यांचा संदेश देत ती कायम लोकांच्या मनाला स्पर्श करते. या मकर संक्रांतीला देखील तिने केवळ शुभेच्छांपुरते न थांबता, सणाच्या प्रतीकांतून एक सुंदर जीवनधडा दिला. व्हिडीओ शेअर करत तिने सर्वांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

ईशा कोप्पिकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणते, "तीळ थोडे कडू असतात आणि गूळ गोड असतो. दोन्ही एकत्र आल्यावर आपल्याला आयुष्यातील अडचणींची आठवण करून देतात. पण आपली बोलण्याची पद्धत, आपले वागणे नेहमी गोड, आपुलकीचे आणि आदरपूर्ण असायला हवे. छोट्या गप्पा, दयाळूपणाचे छोटे कृती आपल्या नात्यांना अधिक मजबूत करतात. म्हणून या मकर संक्रांतीला तीळ-गूळ घ्या आणि गोड-गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "संक्रांतीसारखा सण नाही—थंड हवा, अंधार पडेपर्यंत पतंग उडवणे आणि गूळाचे लाडू खाऊन तृप्त होणे. एकदम देसी आनंद!”


ईशाचा हा विचारपूर्ण संदेश चाहत्यांच्याही मनाला भिडला. आयुष्यात अडचणी असतातच, पण त्यांना गोडी आणि सौजन्याने कसे सामोरे जायचे, हे आपल्या हातात आहे, याची तिने आठवण करून दिली. प्रत्येक सणाला सकारात्मकता आणि अर्थपूर्ण विचार शेअर करण्याची ईशाची सवय तिला केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच नव्हे, तर लोकांना प्रेरणा देणारी आणि समाजाशी जोडलेली व्यक्तिमत्त्व बनवते.

Web Title : ईशा कोप्पीकर का मकर संक्रांति संदेश: मीठे बोल रिश्तों को मजबूत करते हैं

Web Summary : 'खल्लास गर्ल' के रूप में मशहूर ईशा कोप्पीकर ने मकर संक्रांति पर मीठे और सम्मानजनक संवाद के महत्व पर जोर दिया। उन्होंने बताया कि कैसे दयालुता रिश्तों को मजबूत करती है, और सभी से सकारात्मकता अपनाने का आग्रह किया।

Web Title : Isha Koppikar's Makar Sankranti Message: Sweet Words Strengthen Bonds

Web Summary : Isha Koppikar, celebrated as the 'Khallas Girl', shared a Makar Sankranti message emphasizing the importance of sweet and respectful communication. She highlighted how kindness strengthens relationships, urging everyone to embrace positivity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.