'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरचा १४ वर्षांचा संसार मोडला, पती टिम्मी नारंगसोबत घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:00 AM2023-12-28T09:00:25+5:302023-12-28T09:02:23+5:30

47 वर्षीय ईशाने घटस्फोटामागचं कारण सांगितलं, म्हणाली,...

Isha Koppikar gets divorce with husband Timmy Narang after 14 years of marriage | 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरचा १४ वर्षांचा संसार मोडला, पती टिम्मी नारंगसोबत घेतला घटस्फोट

'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरचा १४ वर्षांचा संसार मोडला, पती टिम्मी नारंगसोबत घेतला घटस्फोट

बॉलिवूडमध्ये लग्न, घटस्फोट हे काही नवीन नाही. अरबाज-मलायका, हृतिक रोशन-सुझैन खान यांनी अनेक वर्षांचा संसार मोडला. आता नुकतंच आणखी एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. अभिनेत्री ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) आणि पती टिम्मी नारंग (Timmy Narang) यांनी लग्नाच्या १४ वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. ४७ वर्षीय ईशाने 2009 मध्ये टिम्मी नारंगसोबत लग्न केले होते. त्यांना ९ वर्षांची मुलगी आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया' च्या माहितीनुसार, ईशा कोप्पीकरने आपला १४ वर्षांचा संसार का मोडला यामागचं कारणही समोर आलं आहे.  इतकंच नाही तर तिने आपली ९ वर्षांची लेक रियानासह टिम्मीचं घर सोडलं आणि वेगळ्या घरात शिफ्ट झाली. मागच्याच महिन्यात त्यांचा घटस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ईशा म्हणाली,'आमच्यात बरेच वाद सुरु होते. कुठल्याच गोष्टीत एकमत होत नव्हतं. सुसंगतता राहिली नव्हती. आम्ही संसार वाचवायचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही.'

ती पुढे म्हणाली,'सध्या मला काहीच बोलता येणार नाही. आताच काही सांगणं म्हणजे घाई होईल. मला प्रायव्हसी द्या. मी तुमची काळजी समजू शकते. पण सध्या मला एकटं सोडा.'

ईशा कोप्पीकर आणि टिम्मी नारंग यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. 2009 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. टिम्मी नारंग हॉटेलियर, बिझनेसमॅन आहेत. तर ईशाने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. तिला 'खल्लास गर्ल' नावाने लोकप्रियता मिळाली. तिने 'कृष्णा कॉटेज','हम तुम','क्या कूल है हम','एक विवाह ऐसा भी' यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केले आहे.

Web Title: Isha Koppikar gets divorce with husband Timmy Narang after 14 years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.