'खल्लास गर्ल'चा घटस्फोट, पती टिम्मी नारंगने केलं कन्फर्म; ९ वर्षांच्या लेकीसह ईशाने घर सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:10 AM2024-01-08T10:10:43+5:302024-01-08T10:15:06+5:30

ईशा कोप्पिकरचा 14 वर्षांचा संसार मोडला

Isha Koppikar divorce husband Timmy Narang confirms the news says now we are free to move on | 'खल्लास गर्ल'चा घटस्फोट, पती टिम्मी नारंगने केलं कन्फर्म; ९ वर्षांच्या लेकीसह ईशाने घर सोडलं

'खल्लास गर्ल'चा घटस्फोट, पती टिम्मी नारंगने केलं कन्फर्म; ९ वर्षांच्या लेकीसह ईशाने घर सोडलं

'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) आणि पती टिम्मी नारंग (Timmy Narang) यांचा १४ वर्षांचा संसार मोडल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. आता या बातमीला टिम्मी नारंगने दुजोरा दिला आहे. पत्नी ईशासोबत घटस्फोट झाल्याचं त्याने नुकतंच कन्फर्म केलं आहे. तसंच दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतंत्र असल्याचंही त्याने म्हटलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केल्याचंही त्याने सांगितलं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार टिम्मी नारंगने सांगितले की,"गेल्या दीड वर्षांपासून आम्ही घटस्फोटाचा विचार करत होतो. यानंतर अखेर आम्ही अर्ज दाखल केला. म्युच्युअल पद्धतीने आम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घटस्फोट दाखल केला. आम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यास स्वतंत्र आहोत हे खरं आहे. त्यामुळे मला नाही वाटत यात आता काही शंका राहिली आहे. मी लेटेस्ट रिपोर्ट अजून पाहिले नाहीत पण कायदेशीर पर्याय हा मुळात पर्याय नाही कारण घटस्फोट आधीच झाला आहे. हे अगदी सोप्पं आहे. आणि होय ईशा आमच्या लेकीला घेऊन शिफ्ट झाली आहे."

ईशा कोप्पिकर आणि बिझनेसमॅन टिम्मी नारंग 2009 साली लग्नबंधनात अडकले होते. जिममध्ये त्यांची ओळख झाली होती आणि नंतर ते प्रेमात पडले. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना रियाना ही ९ वर्षांची मुलगी आहे. मात्र आपापसातील काही मतभेदांमुळे त्यांचा १४ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. ईशाने यावर खुलासा करत सांगितले की,'सध्या मी काही बोलू इच्छित नाही. आताच काहीही सांगणे म्हणजे घाईचे ठरेल. मला एकांत हवा आहे.'

ईशाने अनेक तमिळ आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. 'खल्लास गर्ल' म्हणून तिची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. 'डॉन','क्या कूल है हम','क्रिश्ना कॉटेज','एक विवाह ऐसा भी' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.

Web Title: Isha Koppikar divorce husband Timmy Narang confirms the news says now we are free to move on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.