इशा गुप्ता आँखेमध्ये झळकणार अमिताभ बच्चन यांच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 12:03 IST2017-02-20T06:33:48+5:302017-02-20T12:03:48+5:30

अक्षय कुमार, परेश रावल, अर्जुन रामपाल आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला आँखे हा चित्रपट खूपच गाजला होता. ...

Isha Gupta will be seen in the eye with Amitabh Bachchan | इशा गुप्ता आँखेमध्ये झळकणार अमिताभ बच्चन यांच्यासोबत

इशा गुप्ता आँखेमध्ये झळकणार अमिताभ बच्चन यांच्यासोबत

्षय कुमार, परेश रावल, अर्जुन रामपाल आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला आँखे हा चित्रपट खूपच गाजला होता. काही नेत्रहिन व्यक्तींनी एका बँकेत लूट केली असल्याचे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय आणि चित्रपटाची कथा यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती आणि आता या चित्रपटाचा आँखे 2 हा सिक्वल येत असून या चित्रपटात अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल हे आँखेमधील कलाकार झळकणार आहेत तर काही नव्या कलाकारांची एंट्री आँखे 2 मध्ये होणार आहे. आँखे 2मध्ये अनिल कपूर, अर्शद वारसी प्रमुख भूमिकेत दिसणार असून आता इशा गुप्तानेदेखील हा चित्रपट नुकताच साइन केला आहे. 
आँखे 2 या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असल्याने त्यांच्यासोबत काम  करायला मिळत असल्याचा इशा गुप्ताला खूप आनंद होत आहे. खरे तर या चित्रपटात एलिना डिक्रूझ प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण काही कारणास्तव तिने हा चित्रपट नाकारल्याने या चित्रपटात इशाची वर्णी लागली आहे. इशा गुप्ता या चित्रपटाविषयी सांगते, "अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. पिंक हा चित्रपट पाहिल्यानंतर तर अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारायला मिळाली तरी तो चित्रपट करायचा असे मी ठरवले होते. अमिताभ बच्चन हे अभिनयाचे एक चालते फिरते विद्यापीठ आहे. त्यांना अभिनय करताना पाहाणे हा एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे निर्माते गौरंग दोशी यांनी मला आँखे 2 बाबत विचारल्यानंतर एका क्षणाचाही विलंब न करता मी या चित्रपटाला होकार दिला. माझी या चित्रपटातील भूमिका खूप महत्त्वाची असल्याने या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. आँखे 2 साठी काही वर्कशॉप, रिडिंग होणार असून ते 10 मार्चपासून सुरू होणार आहेत तर चित्रपटाचे चित्रीकरण 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत होणार असून तेथील काही प्रसिद्ध ठिकाणांसोबतच तेथील एका कॅसिनोमध्येदेखील या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे." 

Web Title: Isha Gupta will be seen in the eye with Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.