ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनमध्ये काही बिनसलं का? त्या गोष्टीमुळे चर्चेला आलं उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 14:09 IST2023-04-06T14:08:37+5:302023-04-06T14:09:07+5:30
Aishwarya Rai-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनमध्ये काही बिनसलं का? त्या गोष्टीमुळे चर्चेला आलं उधाण
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन जेव्हाही चाहत्यांसमोर येतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच भुरळ घालते. अनेक लोक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना बॉलिवूडचे आयडल कपल मानतात. बॉलिवूडच्या या जोडप्याबाबत इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर आली आहे, जी चाहत्यांना निराश करू शकते. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये बिनसल्याचे म्हटले जात आहे.
ऐश्वर्या राय बच्चन नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंग इव्हेंटला गेली होती. या कार्यक्रमात अभिषेक ऐश्वर्यासोबत दिसला नाही. या कारणास्तव या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची अटकळ बांधली जात आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत पोहोचली.
ऐश आणि आराध्याचे फोटोही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यावर लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. जेव्हा आराध्या आणि ऐश्वर्याचे हे फोटो इंटरनेटवर आले, तेव्हा लोकांनी विचारले की अभिषेक कुठे आहे? त्यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. ते दोघे वेगळे होणार आहेत अशा चर्चांना उधाण आले आहे. अभिषेक बच्चन या इव्हेंटला का हजर राहू शकला नाही, हे अद्याप समजलेले नाही. मात्र अशी चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळे या वृत्तात कितपत तथ्य आहे हे आगामी काळात समजेल.
करिश्माला पाहून ऐश्वर्यानं बदलला रस्ता
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मंदियाळी पाहायला मिळाली. लोक म्हणतात की यापैकी काही स्टार्समध्ये विचित्र क्षणाचाही सामना करावा लागला. या यादीत केवळ सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचीच नावे नसून ऐश्वर्या आणि करिश्माचाही समावेश आहे. आता या दोघांचा अंबानींच्या पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करिश्माला पाहून ऐश्वर्याने आपला रस्ता बदलल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.