सोनाक्षी सिन्हा आहे प्रेग्नेंट? पती जहीर इक्बालसोबतचे फोटोशूट पाहून चाहते देताहेत शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 15:45 IST2024-10-29T15:41:32+5:302024-10-29T15:45:32+5:30
Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले.

सोनाक्षी सिन्हा आहे प्रेग्नेंट? पती जहीर इक्बालसोबतचे फोटोशूट पाहून चाहते देताहेत शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. आता तिची लेटेस्ट पोस्ट पाहून सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याचा तर्कवितर्क चाहते लावत आहेत. सध्या तिची पोस्ट व्हायरल होत आहे. आतापर्यंत सोनाक्षी आणि जहीरकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सोनाक्षी सिन्हाने काही तासांपूर्वी २८ ऑक्टोबर रोजी तिचा पाळीव कुत्रा आणि पती जहीर इक्बालसोबतचा एक फोटो शेअर केले आहेत. यात तिने अनारकली घातला आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांना ती प्रेंग्नेंट असल्याचे वाटत आहे आणि ते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने 'प्रेग्नेंसीबद्दल अभिनंदन' केले आहे. दुसऱ्या चाहत्याने विचारले, 'ती प्रेग्नेंट आहे का?'
चार महिन्यांपूर्वी लग्न झाले
विवाहित महिलेप्रमाणे सोनाक्षीनेही पतीच्या दीर्घायुष्यासाठी २० ऑक्टोबरला करवा चौथचा उपवास केला होता. त्यावेळी तिने इन्स्टाग्रामवर एक क्यूट आणि मजेदार व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सोनाक्षी आणि जहीरने २०१७ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. दोघे २०२२ मध्ये 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसले होते. त्यांनी २३ जून २०१४ रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते.