कतरिना कैफनंतर आता सोनाक्षी सिन्हाकडेही गुडन्यूज? ओढणीने लपवला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:47 IST2025-10-15T15:45:55+5:302025-10-15T15:47:10+5:30
कतरिनानंतर आता बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्रीकडे गुडन्यूज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हादेखील गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोनाक्षीच्या एका व्हिडीओमुळे या चर्चा रंगल्या आहेत.

कतरिना कैफनंतर आता सोनाक्षी सिन्हाकडेही गुडन्यूज? ओढणीने लपवला बेबी बंप
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आई होणार आहे. कतरिनाने काही दिवसांपूर्वीच प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज दिली. कतरिनानंतर आता बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्रीकडे गुडन्यूज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हादेखील गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोनाक्षीच्या एका व्हिडीओमुळे या चर्चा रंगल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनी मुंबईतील एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटसाठी सोनाक्षीने खास लूक केला होता. लाल रंगाचा डिझायनर ड्रेस सोनाक्षीने घातला होता. केस मोकळे सोडत तिने कपाळावर टिकलीही लावली होती. या इव्हेंटमधील सोनाक्षीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये ती पती झहीरसोबत पापाराझींना पोझ देताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सोनाक्षी ओढणीने तिचा बेबी बंप लपवताना दिसत आहे. तर सोनाक्षीच्या चेहऱ्यावर चाहत्यांना प्रेग्नंसी ग्लोदेखील दिसत आहे. सोनाक्षीच्या या व्हिडीओवर अनेकांनी तशा कमेंटही केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २०२४मध्ये रजिस्टर मॅरेज केलं. आता ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.