लोटपोट हसवण्यासाठी येतोय बाबूराव? परेश रावल यांनी सांगितली 'हेराफेरी ३'ची रिलीज डेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:16 IST2025-04-09T17:12:50+5:302025-04-09T17:16:19+5:30

Hera Pheri 3 Movie : 'हेराफेरी ३' संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Is Baburao coming to make Lotpot laugh? Paresh Rawal revealed the release date of 'Hera Pheri 3', said... | लोटपोट हसवण्यासाठी येतोय बाबूराव? परेश रावल यांनी सांगितली 'हेराफेरी ३'ची रिलीज डेट, म्हणाले...

लोटपोट हसवण्यासाठी येतोय बाबूराव? परेश रावल यांनी सांगितली 'हेराफेरी ३'ची रिलीज डेट, म्हणाले...

'हेरा फेरी' (Hera Pheri Movie) फ्रँचायझी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय सीरिज आहे. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना खूप हसवले. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या निर्मिती आणि प्रदर्शनाच्या चर्चा सातत्याने ऐकायला येत आहेत. एक लँडलाईन फोन, डॉनची धमकी आणि बाबूभैयाचा "उठा ले रे देवा!" यासारखे प्रसिद्ध संवाद हसायला भाग पाडतात. जर तुम्हालाही असा क्षण पुन्हा पहायचा असेल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3 Movie) लवकरच पडद्यावर येण्यास सज्ज असल्याने पुन्हा एकदा तीच जादू अनुभवायला मिळणार आहे.

मंगळवारी एक्स अकाउंटवर एका अनौपचारिक संभाषणादरम्यान, एका चाहत्याने परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल प्रश्न विचारला. अभिनेत्यानेही खूप मजेशीर पद्धतीने उत्तर दिले, "लवकरच! पुढच्या पावसाळ्यापूर्वी!" असे लिहिले. आता चाहते असा अंदाज लावत आहेत की हा चित्रपट २०२६ च्या पहिल्या सहामाहीत थिएटरमध्ये येऊ शकतो.

तिसरा भागाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करणार आहे. यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या तिन्ही कलाकारांनी चित्रपटाचा पहिला सीनही शूट केला आहे. न्यूज १८ नुसार, चित्रपट आता पूर्णपणे फ्लोअरवर आहे आणि त्याचे चित्रीकरण सुरू झाले आहे. 'हेरा फेरी ३' बद्दल बराच काळ गोंधळ होता. सुरुवातीला हा सिनेमा फरहाद सामजी दिग्दर्शित करणार होते. परंतु कायदेशीर आणि निर्मितीशी संबंधित अडचणींमुळे हा चित्रपट थांबवावा लागला. आता निर्माते फिरोज नाडियादवाला आणि प्रियदर्शन यांनी ते पुन्हा रुळावर आणले आहे. 

तिसरा भाग बनवणे हे एक मोठे आव्हान 
प्रियदर्शन एका कार्यक्रमात म्हणाले, "मी पुढच्या वर्षीपासून पटकथेवर काम सुरू करेन. तिसरा भाग बनवणे हे एक मोठे आव्हान असेल कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. लोकांना हसवणे सोपे नाही, विशेषतः दुहेरी अर्थ असलेल्या संवादांशिवाय. पात्रेही आता जुनी झाली आहेत, त्यामुळे कथेला त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल." आता 'हेरा फेरी ३' पहिल्या दोन भागांप्रमाणे मन जिंकू शकेल की नाही हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Is Baburao coming to make Lotpot laugh? Paresh Rawal revealed the release date of 'Hera Pheri 3', said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.