आमिर खान बॉलिवूडमधून घेतोय संन्यास?, रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याला कोसळलं रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 15:33 IST2024-08-19T15:32:28+5:302024-08-19T15:33:20+5:30
Aamir Khan And Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. त्यांच्या पॉडकास्टची पहिली पाहुणी प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन होती. तर आता बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने तिच्या पॉडकास्टवर हजेरी लावली आहे.

आमिर खान बॉलिवूडमधून घेतोय संन्यास?, रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याला कोसळलं रडू
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. त्यांच्या पॉडकास्टची पहिली पाहुणी प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) होती. तर आता बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान(Aamir Khan)ने तिच्या पॉडकास्टवर हजेरी लावली आहे. अलिकडेच आमिर खान आणि रिया चक्रवर्ती एकत्र दिसले. आता रियाने तिच्या पॉडकास्ट 'रिया चक्रवर्ती पॉडकास्ट चॅप्टर २' मध्ये आमिर खानची झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान बॉलिवूड सोडणार असल्याची चर्चा आहे. हे खरे असल्याचेही त्याने सांगितले.
रिया चक्रवर्तीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून तिच्या पॉडकास्टच्या पुढील भागाची झलक दाखवली. हे शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खरा स्टार आणि खरा मित्र आमिर खानचे स्वागत करताना मी उत्सुक आहे. स्टारडम, पितृत्व, दु:ख आणि आणखी बरेच काही त्याच्या अनुभवांवर सखोलपणे पाहण्यासाठी संपर्कात रहा. #Chapter2, भाग शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.
आमिर म्हणाला, नाही, मी खरं सांगतोय...
रियाने आमीरला विचारले की जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्हाला वाटते का मी खूप छान दिसतो. मी स्टार आहे किंवा मी आमिर खान? हे ऐकून आमिर हसला. आमिर पुढे म्हणाला, रिया, तू कमालीचे साहस दाखवले आहेस. माझा जादूवर विश्वास आहे. अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याने चित्रपटांतून बाहेर पडायचे आहे. रिया म्हणाली खोटं. पण आमिर म्हणाला की, नाही, मी खरं सांगतोय. रिया म्हणाली लाय डिटेक्टर टेस्ट कर. आमिर म्हणाला कर.
आमिर खान झाला भावनिक
आमिर खान रडू लागला आणि अश्रू पुसू लागला. ही त्या एपिसोडची एक छोटीशी झलक जिथे आमिर खान भावूक झालेला पाहायला मिळाला. मात्र भावनिक झालेला आमिर खान म्हणाला की, तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझा दुसरा अध्याय तिथून सुरू झाला. रिया चक्रवर्ती आणि आमिर खान यांच्यातील संभाषणाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अभिनेत्रीच्या यूट्यूब चॅनेलवर २३ ऑगस्टला पाहायला मिळेल.