नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पालघरच्या तरुणांना इरफानच्या लेकाने केली 50 हजारांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:36 IST2024-04-30T15:34:44+5:302024-04-30T15:36:15+5:30
इरफानचा लेक बाबील खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जणं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत (irrfan, babil khan)

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पालघरच्या तरुणांना इरफानच्या लेकाने केली 50 हजारांची मदत
अभिनेता इरफानचा लेक बाबील खान हा सर्वांचा लाडका अभिनेता. बाबीलने आजवर मोजक्याच सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. बाबील त्याच्या विनम्र स्वभावाने कायमच चाहत्यांची मनं जिंकत असतो. बाबीलने काहीच दिवसांपुर्वी वडील इरफानचे फोटो पोस्ट करुन त्यांची आठवण जागवली. अशातच बाबीलने केलेल्या एका कृतीने त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलंय.
अलीकडेच मुंबई विमानतळावर NGO कामगारांच्या गटाला बाबील मोठी रक्कम देताना दिसला. ही मदत करताना माझं नाव कुठेही वापरु नका, असं आवाहनही त्याने केलं. बाबिलने विमानतळाबाहेर एनजीओ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आणि त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना थेट जागेवरच 50,000 रुपयांची मदत केली. इतकंच नाही, तर अभिनेता व्हिडिओमध्ये म्हणतो, "तुम्ही चांगलं काम करताय. माझं नाव कुठेही वापरु नका." बाबीलसोबत प्रेम कुमार हा यूट्यूबर दिसत असून तो आणि त्याची टीम पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यातील पाण्याची टंचाई दूर करण्याचं काम करतेय.
बाबील खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... तो आपल्याला 'कला' या सिनेमात पाहायला मिळाला. या सिनेमातील बाबीलच्या छोट्याश्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. बाबीलने नंतर 'फ्रायडे नाईट प्लॅन' सिनेमात काम केलं. याशिवाय आर.माधवन, के के मेनन, द्विवेंदू शर्मासोबत बाबील 'द रेल्वे मॅन' या वेबसिरीजमध्ये झळकला. यशराज फिल्म्सच्या या वेबसिरीजचं खूप कौतुक झालं आणि बाबीलच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली.