इरफान म्हणतो, कबालीसंदर्भातील वक्तव्य म्हणजे विनोद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 17:49 IST2016-06-29T12:19:30+5:302016-06-29T17:49:30+5:30

सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचे पोस्टर आपल्या मदारी चित्रपटापासून चोरलेले आहे, हे वक्तव्य म्हणजे विनोद असल्याचे अभिनेता इरफान खान याने ...

Irrfan says, the statement in favor of the qabbali is Vinod | इरफान म्हणतो, कबालीसंदर्भातील वक्तव्य म्हणजे विनोद

इरफान म्हणतो, कबालीसंदर्भातील वक्तव्य म्हणजे विनोद

परस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचे पोस्टर आपल्या मदारी चित्रपटापासून चोरलेले आहे, हे वक्तव्य म्हणजे विनोद असल्याचे अभिनेता इरफान खान याने सांगितले.
‘एक मनुष्य आणि एक अभिनेता म्हणून मी रजनीकांत यांचा आदर करतो. मी पोस्टरसंदर्भात जे काही बोललो तो एक विनोद होता. मी ज्या पोस्टर संदर्भात बोललो, तो त्यांच्या फॅन क्लबने तयार केलेल्या पोस्टरसंदर्भात होते.’, असेही इरफान म्हणाला.
आपल्या येत्या मदारी चित्रपटाच्या पोस्टरपासूनच कबालीचे पोस्टर चोरले असल्याचे इरफान काल म्हणाला होता.
दोन्ही पोस्टरवर इरफान आणि रजनीकांत असून, त्याभोवताली खूप साºया इमारती आणि स्कायस्क्रॅपर्सना दाखविण्यात आले आहे. 
आपण ज्या सिस्टीमध्ये राहत आहोत, त्यासंदर्भातील मदारी हा चित्रपट असून, चुकीच्या प्रश्नावर आपण बोलत नाही’ असेही तो म्हणाला.

Web Title: Irrfan says, the statement in favor of the qabbali is Vinod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.