सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडमध्ये इरफान खानला मानयचा आपला रोल मॉडल, या व्हिडीओतून झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:25 IST2020-07-01T15:20:42+5:302020-07-01T15:25:26+5:30
सुशांतच्या एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडमध्ये इरफान खानला मानयचा आपला रोल मॉडल, या व्हिडीओतून झाला खुलासा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. सुशांतच्या एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत सुशांत बॉलिवूडमध्ये आपला रोल मॉडलविषयी सांगताना दिसतो आहे.
या व्हिडीओत सुशांत म्हणतोय, , 'त्याला काही तरी वेगळे काम करायचे आहे. त्याला दिवंगत अभिनेता इरफान खानसारखे व्हायचे होते. सुशांत स्वत: ला स्टार ना तर अभिनेता मानायचा. त्याचा म्हणणे होते की, पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. पण एका कलाकाराला आपल्या मर्यादा कळल्या पाहिजेत. सुशांत त्याच्या अभिनयाबद्दल खूप वेगळा विचार करायचा.
सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचा नमूना मिळाले नाहीत. त्याच्या नखातही काहीच मिळाले नाही. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहे. या प्रकरणी त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील त्याची सहकलाकार संजना सांघीचाही जबाब नुकताच नोंदवण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 28 लोकांचा जबाब नोंदवला आहे.