​इरफान खान म्हणाला, विनोद खन्नांसाठी अवयवदानही करेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 11:45 IST2017-04-07T06:15:40+5:302017-04-07T11:45:40+5:30

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता इरफान खान सध्या प्रचंड दु:खी आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना ...

Irrfan Khan said, "Vinod Khanna will also organize organs | ​इरफान खान म्हणाला, विनोद खन्नांसाठी अवयवदानही करेल

​इरफान खान म्हणाला, विनोद खन्नांसाठी अवयवदानही करेल

लिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता इरफान खान सध्या प्रचंड दु:खी आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या काल व्हायरल झालेल्या एका फोटोने इरफान अंर्त:मनातून हादरून गेलाय. मी विनोद खन्नांचा मोठा चाहता आहे. त्यांना अशा स्थितीत बघून मला तीव्र वेदना होत आहे, असे इरफानने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर गरज पडल्यास आपण विनोद खन्ना यांच्यासाठी अवयवदान करण्यासही तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.



इरफान खान आणि सबा कमर यांच्या ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा काल पार पडला. त्यावेळी इरफानने विनोद यांचा फोटो पाहिल्याचे सांगत त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली.  विनोदजींची अवस्था पाहून खूप दु:ख होत आहे. ते लवकरात लवकर बरे होवोत, एवढीच मी प्रार्थना करतो. मला कुठल्याही रूपात त्यांची मदत करता आली, तर मी सदैव तत्पर आहे. त्यांच्यासाठी मला माझा अवयव दान करता आला तर मी तेही करेल. त्यांचे आरोग्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेवटी विनोद खन्नांचा मी मोठा चाहता आहे. आपल्या काळातील हँडसम अ‍ॅक्टर्सपैकी ते एक आहेत, असे इरफान म्हणाला.

ALSO READ : official statement: ​विनोद खन्ना यांची प्रकृती सामान्य, अफवांवर विश्वास ठेऊ नये

गत शुक्रवारी विनोद खन्ना यांना अचानक रूग्णालयात भरती करण्यात आले होते. शरिरात पाणी कमी झाल्यामुळे विनोद खन्ना यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. याचदरम्यान काल विनोद खन्ना यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि हा फोटो पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण या फोटोतील विनोद खन्ना यांना ओळखणेही कठीण आहे. आजारापणाने ते अगदी खंगून गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद खन्ना ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त आहे. अर्थात अद्याप विनोद खन्ना यांचे कुटुंबीय वा रूग्णालयाने याला दुजोरा दिलेला नाही. रूग्णालयाने आज एक हेल्थ बुलेटिन जारी करून, विनोद खन्ना यांच्याबद्दलच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Irrfan Khan said, "Vinod Khanna will also organize organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.