इरफान खान विकणार डिझाईनर कपडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:01 IST2017-01-06T16:01:17+5:302017-01-06T16:01:17+5:30
अभिनेता इरफान खान लकवरच तुम्हाला डिझाईनर कपडे विकताना दिसणार आहे. होय, अर्थात रियल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. याचा ...

इरफान खान विकणार डिझाईनर कपडे?
अ िनेता इरफान खान लकवरच तुम्हाला डिझाईनर कपडे विकताना दिसणार आहे. होय, अर्थात रियल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. याचा आगामी चित्रपट येत्या मार्चमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘हिंदी मीडियम’. ‘शादी के साईड इफेक्ट्स’ फेम दिग्दर्शक साकेत चौधरी हा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘हिंदी मीडियम’ एक रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा आहे. यात इरफान एका पंजाबी व्यापाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात तो चांदणी चौकातील एका कपड्यांच्या दुकानाचा मालक बनला आहे. यात इरफानच्या अपोझिट आहे ती, पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर.
दिल्लीत अलीकडे या चित्रपटाचे ‘रिअल लोकेशन्स शॉट्स’ घेण्यात आले. चांदनी चौक, आनंद लोक, करोल बाग आणि संगम विहार अशा अनेक ठिकाणी चित्रपटाचे शूटींग झाले. याठिकाणी इरफान व सबा या दोघांनाही व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन महिन्याच्या संपूर्ण शूटींग शेड्यूलदरम्यान त्यांना भाड्याच्या फ्लॅटमध्ये तयार व्हावे लागले. शूटींगदरम्यान स्थानिकांची गर्दी-गोंधळ टाळण्याच्या हेतूने या भागात मध्यरात्रीनंतर शूटींग केले गेले. मध्यरात्री शूटींग सुुरू करायचे आणि पहाटे ५ वाजता शूटींग गुंडाळायचे, अशा पद्धतीने त्याचे नियोजन केले गेले. विशेष म्हणजे, इरफानच्या दुकानात काम करणारे नोकर कुणी प्रोफेशनल अॅक्टर नव्हते तर चांदणी चौकातीलच काही दुकानांतून त्यांना आणले गेले. इरफान अगदी चांदणी चौकातील खराखुरा दुकानदार वाटावा, यासाठी त्याचे लूकही अगदी तसेच खरेखुरे ठेवण्यात आले. चांदनी चौक, आनंद लोक, करोल बाग आणि संगम विहार याशिवाय दक्षिण दिल्ली, गुडगाव आणि नोएडा या पॉश भागातही या चित्रपटाचे काही शूटींग झाले.
पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. आता तिचा आणि इरफानचा हा ‘रिअल लोकेशन्स शॉट्स’असलेला चित्रपट पाहण्याची तुमची उत्सूकता शिगेला पोहोचली असणार, होय ना?