इरफान खानवर कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये उपचार सुरु, ICU मध्ये करण्यात आले भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:21 IST2020-04-28T17:15:26+5:302020-04-28T17:21:53+5:30
इरफान गेल्या दीर्घकाळापासून आजारी आहे.

इरफान खानवर कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये उपचार सुरु, ICU मध्ये करण्यात आले भरती
बॉलिवूड अभिनेता इरफान खानची प्रकृती अचानक बिघडली आहे. इरफानला मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सध्या इरफान ICUमध्ये दाखल आहे. नक्की इरफानला काय झाले म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
काही दिवसांपूर्वीच इरफानची आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने आपल्या आईचे शेवटचे दर्शन हे व्हिडिओ कॉलद्वारे घेतले.
इरफान गेल्या दीर्घकाळापासून आजारी आहे. २०१७ मध्ये जूनपासून इरफान उपचार घेण्याकरता परदेशात गेला होता. इरफान खानला कॅन्सर झाल्याचे त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजार झाला होता. जवळपास ९ ते १० महिन्यांच्या उपचारानंतर इरफान खान बरा झाला आहे. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून त्याने कमबॅक केले होते. सिनेमाच्या शूटिंगनंतर तब्येत बिघडल्यामुळे तो चित्रपटांपासून दूर स्वत: ची काळजी घेत होता.