‘उडता पंजाब’च्या वादात इरफानची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:16 IST2016-06-11T11:46:25+5:302016-06-11T17:16:25+5:30
‘उडता पंजाब’बाबत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिके च्या विरोधात सर्व बॉलिवूड एकवटले असून या वादात प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननेदेखील उडी ...

‘उडता पंजाब’च्या वादात इरफानची उडी
‘ डता पंजाब’बाबत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिके च्या विरोधात सर्व बॉलिवूड एकवटले असून या वादात प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननेदेखील उडी घेतली आहे.
त्याने आपल्या स्पष्टिकरणात म्हटले आहे की, संपूर्ण देशच सेन्सॉर बोर्ड झाला आहे. जरा कोणी वेगळे विचार मांडले, वेगळी भूमिका घेतली, तर त्याच्यावर टीका केली जाते, असं म्हणून इरफान खाननं केंद्रातल्या मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
चित्रपट उद्योग वर्षाकाठी ४ हजार कोटींचा कर देतो. या कामगिरीमुळे आमचं कौतुक व्हायला पाहिजे पण आमच्याबाबतीत उलटंच होतं, असंही इरफान खान म्हणाला आहे.