​इरफान खानच्या चित्रपटावर बांग्लादेशात बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 20:56 IST2017-02-18T15:26:23+5:302017-02-18T20:56:23+5:30

आंतराष्ट्रीय कलाकार व बॉलिवूड अभिनेता इरफान खान आपल्या जिवंत अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने बॉलिवूड व हॉलिवूड चित्रपटात साकारलेल्या भूमिका ...

Irfan Khan's film ban in Bangladesh! | ​इरफान खानच्या चित्रपटावर बांग्लादेशात बंदी!

​इरफान खानच्या चित्रपटावर बांग्लादेशात बंदी!

तराष्ट्रीय कलाकार व बॉलिवूड अभिनेता इरफान खान आपल्या जिवंत अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने बॉलिवूड व हॉलिवूड चित्रपटात साकारलेल्या भूमिका चांगल्याचा गाजल्या आहेत. इरफान खानचा ‘नो बेड आॅफ रोजेस’ या चित्रपटावर भारताचा शेजारी बांग्लादेशने बंदी घातली आहे. या चित्रपटातील काही भाग प्रसिद्ध बांग्ला लेखक व दिग्दर्शक हुमायूँ अहमद यांच्या जीवनावर असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अचानक आलेल्या या निर्णयाने इरफान खानने आश्यर्च व्यक्त केले आहे. 

बांग्ला लेखक व दिग्दर्शक हुमायूँ अहमद यांच्या जीवनातील काही भागावर हा चित्रपट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अहमद नावाची एक व्यक्तीरेखा आहे. ही व्यक्तीरेखा २७ वषार्नंतर आपल्या पत्नीला घटस्फोट देते व वयाने ३३ वर्षे लहान असलेल्या एका अभिनेत्रीसोबत लग्न करते अशी या चित्रपटाची कथा आहे. बांग्लादेशी दिग्दर्शक मुस्तफा सरवार फारुकी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. 



बांग्लादेश फिल्म डेव्हलपमेंट कापोर्रेशनने (बीएफडीसी) मागील वर्षी ८ मार्च  रोजी या कथेला मंजुरी दिली होती. तर यावर्षी १२ फेब्रुवारीला ‘बीएफडीसी’ने चित्रपट पाहून १५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शन करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र प्रमाणपत्र दिल्याच्या एकाच दिवसानंतर बीएफडीसीने हे प्रमाणपत्र रद्द केले व चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले. यामागे बांग्लादेश इन्फर्मेशन मिनिस्ट्रीने या चित्रपटावर बंदी घलण्याचा निर्णय घेतला आहे असे पत्राद्वारे कळविण्यात आले. 

आपल्या चित्रपटाबर बंदी आल्यानंतर मीडियाशी बोलताना इरफान म्हणाला, ‘बांग्लादेश सरकारने चित्रपटावर बंदी घातली आहे हे माझ्यासाठी आश्यर्चकारक आहे, हा चित्रपट मानवी नात्याची कथा आहे. हा चित्रपट लोकांनी पाहिला तर लोकांचे काही नुकसान होणार आहे असे मला वाटत नाही. 
इरफान खानने बॉलिवूड शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका केल्या आहेत. स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या जुरासिक पार्क व टॉम हँक्ससोबत इन्फर्नो या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Irfan Khan's film ban in Bangladesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.