​इरफान खानला गँगटोकमध्ये चाहत्यांनी घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 11:21 IST2017-03-06T05:51:35+5:302017-03-06T11:21:35+5:30

इरफान खानने आज केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. तो ...

Irfan Khan is surrounded by fans in Gangtok | ​इरफान खानला गँगटोकमध्ये चाहत्यांनी घेरले

​इरफान खानला गँगटोकमध्ये चाहत्यांनी घेरले

फान खानने आज केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. तो सध्या दिग्दर्शक तनुजा चंद्राच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या गँगटोक येथे सुरू आहे. या चित्रपटाचे गँगटोकला चित्रीकरण करत असताना इरफानला खूपच वेगळा अनुभव आला. त्याला त्याच्या चाहत्यांनी तिथे अक्षरशः घेरले होते.  
तनुजा चंद्रा दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इरफान गँगटोक येथे गेला होता. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी हा एक एक रोमँटिक चित्रपट असून या चित्रपटात इरफानचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील विविध भागात सध्या सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इरफानने रेवरी, बिकानेर, हृषिकेश अशा भारतातील विविध ठिकाणांना नुकत्याच भेटी दिल्या आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण गँगटोकमध्ये आटपून तो आता पुन्हा मुंबईला परतला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्चपर्यंत संपणार असल्याचे म्हटले जात आहे. 
गँगटोकमधील काही सार्वजनिक ठिकाणी तो चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्यावेळी लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून तो भारावून गेला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे त्याला गँगटोकमधील विविध स्थळांना भेटी देता आल्या. तसेच गँगटोकमधील लोकांना भेटता आले याचा मला खूप आनंद होत आहे असे तो सांगतो. खरे तर गँगटोकमध्ये बॉलिवूड चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जात नाहीत. पण तरीही तेथील लोकांनी इरफानला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. लोकांनी दिलेला हा प्रतिसाद पाहून इरफानसोबतच चित्रपटाच्या टीममधील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 




Web Title: Irfan Khan is surrounded by fans in Gangtok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.