​ इरफान खान गैरहजर, म्हणून रखडतोय ‘हिंदी मीडियम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:35 IST2017-02-21T11:05:06+5:302017-02-21T16:35:06+5:30

इरफान खानचा ‘हिंदी मीडियम’ पाहण्यास तुम्ही उत्सूक असाल. पण हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. आधी ‘हिंदी मीडियम’ ३१ मार्चला ...

Irfan Khan non-existent, hence the 'Hindi Medium'! | ​ इरफान खान गैरहजर, म्हणून रखडतोय ‘हिंदी मीडियम’!

​ इरफान खान गैरहजर, म्हणून रखडतोय ‘हिंदी मीडियम’!

फान खानचा ‘हिंदी मीडियम’ पाहण्यास तुम्ही उत्सूक असाल. पण हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. आधी ‘हिंदी मीडियम’ ३१ मार्चला रिलीज होणार होता. पण आता तो १२ मे रोजी रिलीज होणार आहे. ‘हिंदी मीडियम’ रखडण्यामागचे कारण पाकिस्तानी हिरोईल सबा कमर असेल, असा तुमचा अंदाज असेल तर तुम्ही चुकता आहात. असे अजिबात नाहीय. चित्रपट रखडला त्यामागचे कारण सबा नसून यातील हिरो इरफान खान आहे. होय, इरफानमुळे चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्याची खबर आहे.

इरफान सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. एकाचवेळी अनेक चित्रपटांवर काम म्हणजे तारखांचा घोळ होणारच. आधी तर इरफान ‘हिंदी मीडियम’साठी जाणीवपूर्वक तारखा देत नसल्याचे सांगितले गेले. म्हणजे तशी चर्चा पसरली. पण असे नाहीय. इच्छा असूनही इरफान ‘हिंदी मीडियम’साठी तारखा देऊ शकत नाहीय. शूटींग शेड्यूल वेळेत संपवण्याची त्याला इच्छा आहे. पण कमिटमेंट्स इतक्या आहेत की त्यासमोर तोही हतबल आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हिंदी मीडियम’च्या एका महत्त्वपूर्ण भागाचे शूटींग अद्याप बाकी आहे. यात सबा आणि इरफान यांची युवावस्था दाखवली जाणार आहे. पण इरफानच्या डेट्स मिळत नसल्याने हा सीक्वेंस शूट व्हायचा आहे. इरफानशिवाय या सीक्वेंसचे शूटींग शक्य नसल्याने मेकर्सही अगतिक आहेत. इरफानच्या तारखा मिळण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही.

ALSO READ : इरफान खानचा रोमांटिक अंदाज : ‘हिंदी मीडियम’चा फर्स्ट लूक
SEE POSTER: इरफान खान स्टारर ‘हिंदी मीडियम’चे टीझर पोस्टर आऊट

या चित्रपटात दिल्लीच्या चांदनी चौक येथे राहणाºया एका मीडल क्लास कुटुंबाची कथा दाखविली जाणार आहे. दिल्लीतील हाय क्लास सोसायटीमध्ये अ‍ॅडजेस्ट होण्याचा प्रयत्नात त्यांच्या जीवनात होणारी उलथापालथ ही या चित्रपटाची मुख्य कथा आहे.  
 

Web Title: Irfan Khan non-existent, hence the 'Hindi Medium'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.