इरफान खान आयुर्वेदिक उपचार घेत असल्याच्या चर्चेवरून केला गेला मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 19:39 IST2018-03-24T14:09:13+5:302018-03-24T19:39:21+5:30
अभिनेता इरफान खान त्याच्या आजारपणावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेत असल्याच्या सातत्याने चर्चा समोर येत आहेत. पण आता त्याविषयी एक मोठा खुलासा समोर आला आहे.
.jpg)
इरफान खान आयुर्वेदिक उपचार घेत असल्याच्या चर्चेवरून केला गेला मोठा खुलासा!
आ ल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता इरफान खान सध्या एका गंभीर आजाराला लढा देत आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी सध्या तो लंडनला आहे. इरफानने त्याच्या आजाराचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. इरफानला नेमका कोणता आजार झाला याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यानंतर इरफानने स्वत:च खुलासा करताना तो न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते. यानंतर सोशल मीडियावर इरफानच्या आजारावरून विविध अफवा फसरविल्या जात आहेत. त्यातीलच एक अफवा म्हणून या आजारावर मात करण्यासाठी तो आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या वृत्तास अद्यापपर्यंत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. आता इरफानच्या प्रवक्त्याकडून याविषयीचा एक खुलासा केला आहे.
इरफानने त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा केल्यानंतर सोशल मीडियावर सातत्याने चर्चा रंगत आहे की, इरफान आयुर्वेदिक उपचार घेत आहे. न्यूज रिपोर्ट्सनुसार, इरफानच्या प्रवक्त्याने सांगितले की, इरफान खान आयुर्वेदिक डॉक्टर बालेन्दू प्रकाश यांच्याकडून उपचार घेत नाही. त्यांनी एकदा इरफानला संपर्क साधला होता, परंतु उपचाराबद्दल काहीही बोलणे झाले नाही. स्वत:च्या पब्लिसिटीसाठी एखाद्याच्या आजारपणाचा फायदा घेणे योग्य नाही. इरफानने त्याच्या गेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की, मला उपचारासाठी स्पेसची आवश्यकता आहे. त्यामुळे माझ्या पत्नीच्या स्टेटमेंटची प्रतीक्षा करा.
दरम्यान, इरफानने ५ मार्चला ट्विट करून सांगितले होते की, तो एका गंभीर आजाराशी लढा देत आहे. तसेच मी माझ्या आजारपणाबद्दल लवकरच खुलासा करेल. त्यानंतर १६ मार्चला त्याने त्याच्या आजापरणाबद्दल खुलासा करताना ‘न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर’ या आजाराशी ग्रस्त असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच याविषयी काहीही सांगणे मुश्किल असले तरी, माझ्या आतली शक्ती आशेचे किरण जागवून आहे, असे त्याने म्हटले होते.