जयपुरमध्ये इरफान करणार ‘बालदिन’ सेलिब्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 17:32 IST2016-11-12T17:32:06+5:302016-11-12T17:32:06+5:30
समंजस अभिनय, निवडक चित्रपट आणि उत्कृष्ट भूमिका करणारा इरफान खान जयपूरमध्ये ‘बालदिन’ साजरा करणार असल्याचे कळतेय. ‘चिल्ड्रेन फिल्म सोसायटी ...

जयपुरमध्ये इरफान करणार ‘बालदिन’ सेलिब्रेट!
स ंजस अभिनय, निवडक चित्रपट आणि उत्कृष्ट भूमिका करणारा इरफान खान जयपूरमध्ये ‘बालदिन’ साजरा करणार असल्याचे कळतेय. ‘चिल्ड्रेन फिल्म सोसायटी आॅफ इंडिया’आयोजित ‘नॅशनल चिल्ड्रेन्स फिल्म फेस्टिव्हल’ला पाठिंबा देण्यासाठी इरफान खान जयपूरला त्याच्या जाऊन साजरा करणार आहे. भारतातील लहान मुलांची परिस्थिती सर्वत्र अगदी सारखीच आहे.
‘पिकू’स्टार इरफान म्हणतो की,‘एक अभिनेता म्हणून अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होणं मी माझं कर्तव्य समजतो. माझे चाहते याची नोंद घेतील याचा मला आनंद होतोय. जास्तीत जास्त माझ्या चाहत्यांचा अशा उपक्रमांना प्रतिसाद मिळावा’असे मला वाटते. जयपूरच्या बिर्ला आॅडिटोरियम येथे १४ नोव्हेंबरला हा सोहळा सुरू होणार असून तीन दिवस याअंतर्गत उपक्रम होणार आहे.