लग्नाला अवघे काही तास अन् स्कर्टमध्ये दिसली आयरा खान; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "हिचं लग्न आहे आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:05 IST2024-01-03T15:03:46+5:302024-01-03T15:05:33+5:30
आयराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पार्लरमध्ये जाताना आयराला स्पॉट करण्यात आलं.

लग्नाला अवघे काही तास अन् स्कर्टमध्ये दिसली आयरा खान; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "हिचं लग्न आहे आणि..."
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत आयरा सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आयराच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. आयरा-नुपूरच्या हळदीसाठी किरण राव आणि रीना दत्ता यांनीही नऊवारीत मराठमोळा लूक केला होता. आता आयराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लग्नाला अवघे काही तास उरले असताना आयरा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. पार्लरमध्ये जाताना आयराला स्पॉट करण्यात आलं. यावेळी आयराने छोटा स्कर्ट आणि टीशर्ट परिधान केला होता. तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी आमिरच्या लेकीला ट्रोल केलं आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन आयराचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
"लहानपणीचा ड्रेस घातला आहेस का?" असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "ही तर फिरत आहे...असं वाटतंच नाहीये की हिचं लग्न आहे," अशी कमेंट केली आहे. "अरे ही नवरी आहे ना", असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. "हिचं लग्न आहे हे हिला माहीत तरी आहे का?" अशी कमेंटही एकाने केली आहे.
आयरा आणि नुपूर आज मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्ली आणि जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.