Ira Khan Wedding : ...अन् लेकीच्या लग्नात आमिर खानने Ex पत्नी किरण रावला केलं किस, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 22:49 IST2024-01-03T22:48:50+5:302024-01-03T22:49:11+5:30
आयरा खानच्या लग्नात आमिरची चर्चा, एक्स पत्नी किरण रावला सगळ्यांसमोरच किस केलं अन्...

Ira Khan Wedding : ...अन् लेकीच्या लग्नात आमिर खानने Ex पत्नी किरण रावला केलं किस, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान लग्नबंधनात अडकली आहे. आयराने बॉयफ्रेंड नुपुर शिखरेशी कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आयरा आणि नुपूरचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आयरा खानच्या लग्नातील आमिर आणि त्याची एक्स पत्नी किरण राव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
आयरा खानच्या लग्नासाठी आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी उपस्थितीत होत्या. लेकीच्या लग्नात आमिरने खास शेरवानी सूट परिधान करत फेटा बांधला होता. तर किरण रावने साडी नेसत ग्लॅमरस लूक केला होता. लग्नानंतर रिसेप्शन सोहळ्यात आमिरने त्याच्या दोन्ही पत्नींसह फॅमिली फोटोदेखील काढले. पण, आयराच्या रिसेप्शन सोहळ्यातील किरण आणि आमिरच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नात सगळ्यांसमोरच आमिरने किरण रावला किस केलं. आयराच्या लग्नसोहळ्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आयराने आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा तो फिटनेस ट्रेनर होता. मे महिन्यात आयरा आणि नुपूरचा साखरपुडा पार पडला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.