IPL Betting Case : बेटिंगमध्ये अडकला सलमानचा भाऊ अरबाज खान; ठाणे पोलीस करणार चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 19:28 IST2018-06-01T13:58:15+5:302018-06-01T19:28:15+5:30

बेटिंगमुळे अगोदरच आयपीएल कलंकित झाले असून, या सीजनमध्येही त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण आयपीएल सामन्यांवरील बेटिंग ...

IPL betting case: Salman Khan's brother Arbaaz Khan; Thane police inquiry! | IPL Betting Case : बेटिंगमध्ये अडकला सलमानचा भाऊ अरबाज खान; ठाणे पोलीस करणार चौकशी!

IPL Betting Case : बेटिंगमध्ये अडकला सलमानचा भाऊ अरबाज खान; ठाणे पोलीस करणार चौकशी!

टिंगमुळे अगोदरच आयपीएल कलंकित झाले असून, या सीजनमध्येही त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात आता ठाणे खंडणीविरोधी पथकाने सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानला समन्स बजावला आहे. तसेच या समन्सच्या माध्यमातून त्याला शनिवारी म्हणजेच उद्या चौकशीसाठी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. 

ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु  असलेल्या आॅनलाइन बेटिंगचे रॅकेट उघड करताना डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड हा चालवत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सोनूवर कारवाई करताना त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी सोनूची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे अरबाजही बेटिंग करीत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी अरबाजला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. 

दरम्यान, अरबाज शनिवारी म्हणजेच उद्या चौकशीसाठी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सोनूच्या संपर्कात देशातले ८० ते ९० बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या आसामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे. उद्या अरबाजनंतर आणखी कोणा कोणाची नावे समोर येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

Web Title: IPL betting case: Salman Khan's brother Arbaaz Khan; Thane police inquiry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.