थँक यू कॅप्टन! विराट कोहलीला भेटून जयदीप अहलावत भारावला; कॅप्शननं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:44 IST2026-03-28T12:18:10+5:302026-03-28T12:44:25+5:30

जयदीप अहलावतने आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.  

Ipl 2026 Jaideep Ahlawat Meets Virat Kohli Photo Viral Actor Says Thank You Captain | थँक यू कॅप्टन! विराट कोहलीला भेटून जयदीप अहलावत भारावला; कॅप्शननं वेधलं लक्ष

थँक यू कॅप्टन! विराट कोहलीला भेटून जयदीप अहलावत भारावला; कॅप्शननं वेधलं लक्ष

आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार आज, २८ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील ७० सामने एकूण १२ मैदानांवर खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यातच आता सोशल मीडियावर एका खास भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. बॉलिवूडचा दमदार अभिनेता जयदीप अहलावत आणि भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली यांची नुकतीच भेट झाली आहे.

जयदीप अहलावतने आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत या क्षणाला त्यानं "विराट लम्हा" असे नाव दिले. जयदीपने कॅप्शनमध्ये लिहिले, "IPL 2026 सुरू होण्याच्या एक दिवस आधी… शेवटी आपली भेट झाली. मौल्यवान वेळेसाठी धन्यवाद, कॅप्टन". या फोटोवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


किंग कोहलीचा फुल स्लीव्ह टॅटू
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली एका वेगळ्याच रूपात मैदानात उतरणार आहे. कोहली आपल्या शरीरावर आणखी एक अर्थपूर्ण टॅटू काढला आहे. टॅटू स्टुडिओच्या मते, हा टॅटू कोहलीच्या आयुष्याच्या प्रवासाचं प्रतीक आहे.  त्याच्या व्यक्तीमत्वाचं प्रतिबिंब त्यात अधोरेखित होते. आयुष्यातील विविध टप्प्यांवर त्याने शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जुन्या गोष्टी मागे सोडत स्वतःला नव्याने घडवलं. मात्र काही गोष्टी अधिक मजबूत झाल्या आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात नव्या पैलूंची भर पडली. या सर्वांचा संगम म्हणजे त्याचा हा नवा फुल स्लीव्ह टॅटू आहे. 

जयदीप अहलावत वर्कफ्रंट
दुसरीकडे, जयदीप अहलावत देखील आपल्या कामात व्यस्त आहे. 'इक्कीस'च्या यशानंतर तो आगामी काळात 'हिसाब', 'दृश्यम ३' आणि शाहरुख खानसोबतच्या 'किंग' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title : जयदीप अहलावत विराट कोहली से मिले, इसे 'विराट लम्हा' कहा।

Web Summary : अभिनेता जयदीप अहलावत आईपीएल 2026 से पहले विराट कोहली से मिले, इसे 'विराट लम्हा' कहा। कोहली ने अपने जीवन की यात्रा को दर्शाते हुए एक अर्थपूर्ण फुल स्लीव टैटू बनवाया है। अहलावत 'हिसाब', 'दृश्यम 3' और 'किंग' में दिखेंगे।

Web Title : Jaideep Ahlawat meets Virat Kohli, calls it a 'Virat Lamha'.

Web Summary : Actor Jaideep Ahlawat met Virat Kohli before IPL 2026, calling it a 'Virat Lamha'. Kohli sports a meaningful full sleeve tattoo reflecting his life's journey. Ahlawat will appear in ' হিসেব', 'Drishyam 3', and 'King'.