​‘इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाश वारियरला नकोय बॉयफ्रेन्ड! वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 05:17 AM2018-02-13T05:17:15+5:302018-02-13T10:48:02+5:30

‘व्हॅलेन्टाईन डे’च्या आधीच मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने इंटरनेटवर हजारो लाखो लोकांचा क्रश बनली आहे. ‘ओरू अडार लव’ या ...

'Internet sensation' Priya Prakash Warrior does not want boyfriend! Read what is the reason !! | ​‘इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाश वारियरला नकोय बॉयफ्रेन्ड! वाचा काय आहे कारण!!

​‘इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाश वारियरला नकोय बॉयफ्रेन्ड! वाचा काय आहे कारण!!

googlenewsNext
्हॅलेन्टाईन डे’च्या आधीच मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने इंटरनेटवर हजारो लाखो लोकांचा क्रश बनली आहे. ‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्यातील प्रियाच्या अंदांनी असंख्य तरूणांना वेड लावले आहे. आता तर प्रियाच्या अंदाजावर भाळलेल्या या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, प्रिया अद्यापही सिंगल आहे. आता तुम्ही म्हणाल, हे आम्हाला कसे ठाऊक तर, प्रियाने स्वत: हा खुलासा केला आहे. मला बॉयफ्रेन्डची गरज नाही, असे प्रियाने म्हटले आहे.



प्रियाने अलीकडे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिने लवर पोज दिली होती.  Why need a boyfriend when u have such an amazing girl squad असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. यावरून स्पष्ट होते की, १८ वर्षांची इंटरनेट सेन्सेशन प्रिया अद्यापही सिंगल आहे.
प्रिया प्रकाश वारियर ‘ओरू अडार लव’ या चित्रपटाद्वारे अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. याच चित्रपटातील  ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याचा एक व्हिडिओ इंटनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर जणू आग लावली आहे. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसतेय. शाळेच्या दिवसांची आठवण करून देणा-या या व्हिडिओनंतर प्रिया डेब्यूआधीच लोकप्रीय झाली आहे.
येत्या ३ मार्चला ‘ओरू अडार लव’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. पण त्याआधीच प्रिया चर्चेत आली आहे. प्रियाच्या सौंदर्याचीही चर्चा होऊ लागली आहे. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स हा तिचा जीव की प्राण. याशिवाय भटकंती हाही तिचा आवडता विषय. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या आपल्या पहिल्या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे.

ALSO READ : पाहा, इंटरनेटवर धुमाकूळ घालणा-या प्रिया प्रकाश वारियरचे काही ‘खल्लास’ करणारे फोटो! 

Web Title: 'Internet sensation' Priya Prakash Warrior does not want boyfriend! Read what is the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.