international yoga day : ​बिपाशा बसूने लाडक्या हबीसोबत केला ‘ couples yoga’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 13:22 IST2017-06-21T07:52:25+5:302017-06-21T13:22:25+5:30

आज संपूर्ण जगात योग दिन साजरा होतोय. अशात बॉलिवूड इंडस्ट्री कशी बरे मागे राहणार? बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही धडाक्यात योग दिवस साजरा केला. बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर या दोघांनीही आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजचा दिवस साजरा केला.

international yoga day: Bipasha Basu turns 'couples yoga' with a lovely hubby! | international yoga day : ​बिपाशा बसूने लाडक्या हबीसोबत केला ‘ couples yoga’!

international yoga day : ​बिपाशा बसूने लाडक्या हबीसोबत केला ‘ couples yoga’!

संपूर्ण जगात योग दिन साजरा होतोय. अशात बॉलिवूड इंडस्ट्री कशी बरे मागे राहणार? बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही धडाक्यात योग दिवस साजरा केला. बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर या दोघांनीही आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजचा दिवस साजरा केला. दोघेही ‘कपल योग’ करताना दिसले. ‘कपल योग’चे काही फोटो दोघांनीही आपआपल्या सोशल मीडियावर शेअर केलेत.



या फोटोत दोघेही योग करताना दिसताहेत. पण हा योग कुणीही करू शकत नाही तर यासाठी बºयाच सरावाची गरज असते. यापूर्वीही अनेकदा बिपाशा व करणने आपल्या योगाभ्यासाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून बिपाशा व तिचा लाडका हबी किती फिटनेस वेडे आहेत, हेच कळते. तेव्हा बघा तर बिप्स आणि करणच्या ‘कपल योग’चे काही फोटो. हे फोटो कसे वाटलेत, ते सांगायला मात्र विसरू नका.



ALSO READ : बिपाशा बसूने ‘सौतन’ जेनिफर विंगेटचा व्हिडिओ आधी केला ‘लाईक’ मग केला ‘अनलाईक’ !

अलीकडे बिपाशा चांगलीच चर्चेत आली होती. करणची एक्स वाईफ जेनिफर विंगेटचा एक व्हिडिओ तिने लाईक केला होता. बिपाशाने जेनिफरचा हा व्हिडिओ लाईक केला आणि दुसरीकडे दोघीही ट्रोल व्हायला सुरुवात झाली. अखेर बिपाशाला जेनिफरचा हा व्हिडिओ अनलाईक करावा लागला. जेनिफर विंगेट आणि तिचा एक्स हसबण्ड करण सिंह ग्रोवर या दोघांची ओळख ‘कसौटी जिंदगी की’च्या सेटवर झाली होती. यानंतर ही जोडी ‘दिल मिल गए’मध्ये दिसली होती. याच सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले आणि नंतर दोघांनी लग्नही केले. पण हे लग्न उणेपुरे दोन वर्षे टिकले. जेनिफरशी घटस्फोट घेतल्यानंतर करणने बिपाशाशी लग्न केले. तूर्तास करण व बिपाशा दोघेही आपल्या मॅरेज लाईफमध्ये प्रचंड आनंदी आहेत.

Web Title: international yoga day: Bipasha Basu turns 'couples yoga' with a lovely hubby!