पतौडी कुटुंबातील ही चिमुरडी आजीबाईंकडून घेतेय योगाचे धडे, नेटकऱ्यांसाठी ठरला कौतुकाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 16:36 IST2019-06-21T16:32:33+5:302019-06-21T16:36:17+5:30

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. बॉलिवूड सेलिब्रेटींनी ही मोठ्या उत्साहात यात आपला सहभाग नोंदवला.

International yoga day 2019 soha ali khan's dughter inaaya learning yoga | पतौडी कुटुंबातील ही चिमुरडी आजीबाईंकडून घेतेय योगाचे धडे, नेटकऱ्यांसाठी ठरला कौतुकाचा विषय

पतौडी कुटुंबातील ही चिमुरडी आजीबाईंकडून घेतेय योगाचे धडे, नेटकऱ्यांसाठी ठरला कौतुकाचा विषय

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. बॉलिवूड सेलिब्रेटींनी ही मोठ्या उत्साहात यात आपला सहभाग नोंदवला. मात्र या सगळ्यात एक फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो सोहा अली खानच्या मुलीचा. या फोटोत छोटी इनाया नौमी आपल्या आजीसोबत योग करताना दिसतेय. इनाया आपल्या आजीला कॉपी करत योग करतानाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


हा फोटो कुणाल खेमूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला एक कॅप्शनसुद्धा कुणालने दिले आहे की, ''इनाया आपल्या आजीच्या मार्गदर्शना खाली योगाचे धडे गिरवते आहे.''   


बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूने जानेवारी 2015मध्ये अभिनेत्री सोहा अली खानसोबत लग्न केले आणि 2017मध्ये सोहाने एका मुलीला जन्म दिला. इनाया भाऊ तैमूर अली खान एवढीच क्युट आहे. कित्येक वेळा त्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. याशिवाय इनाया तिच्या करड्या रंगाच्या डोळ्यांमुळे चर्चेत असते.

एका वेबसाईटशी चर्चा करताना कुणालने इनायाच्या डोळ्यांच्या रंगाबद्दल सांगितले की, सोहा आणि माझ्या डोळ्यांचा रंग डार्क आहे व माझ्या आजीच्या डोळ्याचा रंग लाइट आहे. त्यामुळे इनायाच्या डोळ्यांचा रंग तसा आहे.काही दिवसांपूर्वीच कुणाल कपूर अभय या वेबसिरिजमध्ये तसेच करण जोहरच्या मल्टीस्टारर कलंकमध्ये दिसला होता. 

Web Title: International yoga day 2019 soha ali khan's dughter inaaya learning yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.