दिग्दर्शकांची अदलाबदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:54 IST2016-01-16T01:14:32+5:302016-02-06T11:54:07+5:30
माय नेम इज खान आणि स्टुडेंट ऑफ द ईयर चित्रपटानंतर करणचे हे पुनरागमन होत आहे. ते कसे असेल हे ...

दिग्दर्शकांची अदलाबदली
ाय नेम इज खान आणि स्टुडेंट ऑफ द ईयर चित्रपटानंतर करणचे हे पुनरागमन होत आहे. ते कसे असेल हे पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये समजेलच. परंतु सध्या या चित्रपटाबाबत एक पेच पडला आहे. ज्याचा थेट संबंध अयान मुखर्जीशी आहे. अयान त्या मोजक्या दिग्दर्शकांपैकी आहे, ज्यांना रणबीर कपूरच्या अगदी जवळचे मानले जाते. अयानसोबत रणबीरचे जवळचे संबंध पाहून हे स्पष्ट झाले होते की अयानच्या पुढील चित्रपटात रणबीरच अभिनेता असेल. काही दिवसांपूर्वी करण जाैहरच्या कंपनीकडून या बाबत घोषणाही करण्यात आली होती. ऐ दिल है मुश्किलच्या कथेवर अयान मुखर्जीने सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ काम केले. मात्र जेव्हा प्रत्यक्ष शूटिंग सुरू झाली तेव्हा हळूच अयानला बाजूला करुन करण जाैहर स्वत: दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसला. बॉलिवूडच्या इतिहासात यापूर्वीही असे अनेक वेळा बदल झाले आहेत. याच क्रमात आमीर खानने अमोल गुप्तेला हटवून तारे जमीं पे च्या दिग्दर्शनाची जबाबदारी संभाळली होती. अमोलने आमीरवर अनप्रोफेशनल असल्याचा गंभीर आरोप केला होता.
इतिहासात अशा प्रकाच्या बदलाचे दोन- तीन किस्से आणखी आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे शेखर कपूर यांनी जेव्हा मि. इंडिया केला त्याच्या यशानंतर लगेच बोनी कपूरने निर्माता म्हणून मि. इंडियाची टीम (शेखर कपूर, अनिल कपूर आणि श्रीदेवी) सोबत नव्या चित्रपटाची घोषणा केली, ज्याचे नाव होते रुप की रानी, चोरों का राजा. मात्र चित्रपट निर्मितीचे काम जसेजसे पुढे निघाले शेखर कपूर सोबत बोनी आणि अनिल कपूरचे मतभेद वाढत गेले. अखेर दिग्दर्शकाची जबाबदारी शेखर कपूरचे सहायक आणि मि. इंडियामधील कॅलेंडर सतीश कौशिकला दिली गेली आणि परिणाम इतका वाईट राहिला की चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या सोबत हेराफेरीच्या यशानंतर याच्या सिक्वलची जबाबदारी प्रियदर्शन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र मध्येच प्रियदर्शनच्या जागी दिग्दर्शकाची सीट नीरज वोहराने संभाळली. सिक्वल चालला, मात्र पहिल्या चित्रपटासारखा कमाल करू शकला नाही.