'नो एन्ट्री'च्या सिक्वेलमध्ये सलमान खान ऐवजी झळकणार हा अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:00 IST2018-07-20T13:18:35+5:302018-07-20T14:00:11+5:30
'नो एन्ट्री'च्या सिक्वलच्या शुटिंगला लवकरच होणार सुरूवात

'नो एन्ट्री'च्या सिक्वेलमध्ये सलमान खान ऐवजी झळकणार हा अभिनेता?
अभिनेता सलमान खानचा २००५ साली प्रदर्शित झालेला 'नो एन्ट्री' चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, फरदीन खान, ईशा देओल, लारा दत्ता, सेलीना जेटली, बिपाशा बासु, बोमन ईरानी व समीरा रेड्डी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता निर्माता बोनी कपूर या सुपरहिट चित्रपट 'नो एन्ट्री'चा सिक्वल बनवणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. 'नो एन्ट्री' चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता सलमान खान होता आणि सिक्वलमध्ये देखील मुख्य भूमिकेत सलमान असेल, असा तर्क लावला जात होता. मात्र नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बोनी सलमानसोबत नाही तर त्याचा मुलगा अर्जुन कपूरसोबत 'नो एन्ट्री'चा सिक्वल बनवण्याची योजना करतो आहे.
रिपोर्टनुसार सध्या 'नो एन्ट्री'च्या सिक्वलच्या कथेवर काम चालू असून या कथेसाठी नवीन कलाकार हवे आहेत. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांच्या नावावर चर्चा सुरू आहे. मात्र बोनी कपूरला या सिनेमात अर्जुनला मुख्य भूमिकेत घ्यायचे आहे.
'नो एन्ट्री' सिक्वलच्या चित्रीकरणाला अजून वेळ असून सध्या बोनी कपूर अजय देवगणसोबत एका चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटाचे काम आटोपल्यानंतर बोनी कपूर 'नो एन्ट्री'च्या सिक्वलच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. आता या चित्रपटातील कलाकारांची अधिकृत घोषणा बोनी कपूर कधी करतात हे पाहावे लागेल आणि सलमानऐवजी अर्जुन कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.