आलियाऐवजी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीसोबत डिनर डेटला गेला होता रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 15:55 IST2023-12-21T15:54:39+5:302023-12-21T15:55:24+5:30
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

आलियाऐवजी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीसोबत डिनर डेटला गेला होता रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करताना दिसत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा कित्येक पटीने जास्त बिझनेस केला आहे. सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात तो संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्तसोबत दिसत आहे.
टेली चक्करच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या फोटोत त्रिशाला दत्त रणबीर कपूरसोबत दिसत आहे, ज्यामध्ये अॅनिमल फेम अभिनेता ग्रे स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. तर त्रिशाला ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहीले होते, जेव्हा अॅनिमल भेटायला येतो. या फोटोशिवाय आणखीही काही फोटो आहेत, ज्यामध्ये जेवणाची झलक पाहायला मिळते. मात्र, हा फोटो अधिकृत आहे की नाही हे कळू शकलेले नाही. मात्र चाहते त्रिशालाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.
सध्या काय करते त्रिशाला दत्त?
सोशल मीडियावरील पोस्टच्या कमेंटमध्ये एका युजरने लिहिले की, आई ऋचा शर्मा सारखी त्रिशाला पण खूप सुंदर आहे. काही लोकांनी फायर इमोजी शेअर केली आहे. संजय दत्तची मुलगी त्रिशाला सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. ती अमेरिकेत मानसोपचार क्षेत्रात करियर करते आहे. तसेच ती नेहमीच लोकांच्या मेंटल हेल्थशी संदर्भात जनजागृती करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे.