इन्स्टाग्राम आणि फेसबुकची कृपा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:11 IST2016-01-16T01:12:20+5:302016-02-08T05:11:11+5:30
मुलांच्या सोशल मीडियावरील उपस्थितीबद्दल फार काळजी न करणारे पालक, नव्या टेक्नोसॅव्ही वातावरणात स्मार्ट झालेले पाल्य अशा सगळया परिस्थितीचा परिपाक ...

इन्स्टाग्राम आणि फेसबुकची कृपा
ुलांच्या सोशल मीडियावरील उपस्थितीबद्दल फार काळजी न करणारे पालक, नव्या टेक्नोसॅव्ही वातावरणात स्मार्ट झालेले पाल्य अशा सगळया परिस्थितीचा परिपाक म्हणून बॉलिवूड तारे तारकांच्या मुलांनाही त्यांच्या इतके किंबहूना त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात फॅन फॉलोअर लाभत असल्याचे समोर आले आहे. यांचे स्टार पापा कुल असतील तर हे सुपर कुल आहेत. मग तो शाहरुख खानचा अबराम असो वा आर्यन, सैफअलीचा इब्राहिम अली खान पतोडी असो वा श्रीदेवीची खुशी. आपली एक झलकही समाजाला दिसायला नको ही गोष्टच यांना मान्य नाही.
शाहरुख खानचे पहिले अपत्य असणार्या आर्यन खानचे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात फॅन्स आहेत. ७0 हजार नियमित फॉलोअर्स आहेत. त्याचा नवीन फोटो सोशल मीडियावर झळकताच चाहते तो बघायला तुटून पडतात. मुली त्याच्या सुंदरतेवर अगदी भावनाविवश होऊन बोलू लागतात. तू बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यास कसा लायक आहे असा सल्लाही त्याला अनेकांकडून दिला जातो. काही दिवसांपूर्वी समुद्रकिनारी त्याचे अँप्स दाखविणार्या फोटोने कल्लोळ केला होता. अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली हिच्याबरोबर बाहेर फिरतानाचे फोटो, इम्राहिम खानबरोबर पार्टीत मजा करतानाचे फोटो या सार्या गोष्टी त्याच्या फॅनक्लबमध्ये अगदी हिट झाले आहेत.
वय : १८ वर्ष
इन्स्टाग्राम फॉलोअर्स : ५९.६ हजार
आर्यन खान वय : अडीच वर्ष, फेसबुक फॅन पेज लाईक : ४.५ हजार
इन्स्टाग्राम फॉलोअर्स : २0 हजार अबराम खान लोकप्रिय बॉलिवूड किड म्हणून सध्या आर्यनपेक्षाही जास्त अबरामची ओळख आहे. आयपीएल मॅच दरम्यान पहिल्यांदाच लोकांसमोर येणारा अबराम सातत्याने बातमीत असतो. शाहरुख खानचे शूटिंग सुरू असेल त्या ठिकाणी भेट देऊन तो वडिलांप्रमाणे प्रेक्षकांना हात पसरवून अभिवादन करतो. वडिलांच्या लोकप्रिय स्टाईलची कॉपी करतो. आपल्या चिमुकल्या हातांनी तो कॅमेरॅची लेन्स पकडतो आणि शूटिंग बरोबर झाले आहे की नाही तेही पहातो.
इन्स्टाग्राम फॉलोअर्स : ३२.५ हजार इब्राहिम अली खान पतोडी इब्राहिम अली खान पतोडी म्हणजे सैफ अलीचा मुलगा. सैफ अलीला सोशल मीडियापासून चार हात लांबच रहायला आवडतं. पण त्याचा मुलगा इब्राहिम मात्र यावर सक्रिय आहे. त्याला हल्ली इन्स्टाग्राम स्टार म्हणून ओळखले जात आहे. तो श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरबरोबर कुठे कुठे भटकत असतो ते वेळोवेळी इन्स्टाग्रामवर लोड केलेल्या पोस्टमुळे सहज समजते. तो शाहरुख खानचा फॅन असल्याचेही आपल्याला इन्स्टाग्रामवरच समजते.
वय : १७ वर्ष
इन्स्टाग्राम फॉलोअर्स : १४.५ हजार
नव्या नवेली अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता नंदा हिची मुलगी नव्या नवेली नंदा ही कालपर्यंत सोशल मीडियावर नव्हतीच. मागील दान वर्षांपासून आर्यन खानबरोबरचे तिचे फोटो झळकायला लागले आणि इन्स्टाग्रामवर लाईकचा पाऊसच पडायला लागला. 'पश्रीयन ला बेल डेस डेबटंटेस' या प्रसिद्ध बॉल कार्यक्रमात सहभागी होत तिने बातम्यांच्या हेडलाईनमध्ये स्थान मिळविले होते. यु ट्यूबवर शेअर झालेल्या एका व्हिडिओत ती या शोची कशी जोरदार तयारी करते आहे हेही दाखविले होते.
वय : १८ वर्ष
इन्स्टाग्राम फॉलोअर्स : ६१.५ हजार अलिया बेदी पूजा बेदीची मुलगी असणार्या अलिया फर्निचरवाला-बेदीला ६0 हजार इन्स्टाग्राम फॉलोअर्स लाभले आहेत. ही स्टार कन्या सोशल मीडियावरील फॅन्समध्ये इतकी गुंतलेली आहे की या फॅनपैकी काहींना ती प्रत्यक्षात भेटणारही आहे. त्यांच्यासाठी पार्टीही ठेवणार आहे.