'या' आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार 'हे' चित्रपट अन् वेबसीरिज; तुम्ही काय पाहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:55 IST2025-09-04T15:54:45+5:302025-09-04T15:55:08+5:30
या वीकेंडला चित्रपटप्रेमींना घरबसल्या अनेक नवीन चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेता येईल.

'या' आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार 'हे' चित्रपट अन् वेबसीरिज; तुम्ही काय पाहणार?
ऑगस्ट महिना मनोरंजनाच्या दृष्टीने खूप यशस्वी ठरला होता. आता सप्टेंबरचा पहिला आठवडाही चित्रपट आणि सीरिजच्या चाहत्यांसाठी धमाकेदार असणार आहे. या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. चला तर मग पाहूया, या आठवड्यात कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत.
राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chillar)यांचा 'मालिक' (Maalik) हा चित्रपट ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो ५ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या यादीत दुसऱ्य क्रमांकावर विक्रांत मेसी (Vikrant Massey) आणि शनाया कपूर (Shanaya Kapoor) यांचा 'आंखों की गुस्ताखियां' (Aankhon Ki Gustakhiyaan) हा चित्रपट आहे. थिएटरमध्ये ११ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण बॉक्स ऑफिसवर त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) दिग्दर्शित 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) हा या आठवड्यातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. चित्रपटाची कथा 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराजच्या प्रकरणावर आधारित आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे.
अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) मुख्य भूमिकेत असलेला 'घाटी' (Ghaati) हा एक अॅक्शन क्राईम ड्रामा चित्रपट आहे. ड्रग्ज पुरवठ्यामुळे अडचणीत आलेल्या एका महिलेची ही कथा आहे. हा चित्रपट तुम्हाला प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. यासोबत मल्याळम क्राईम ड्रामा 'कम्ममतम' (Kammatam) एका आर्थिक घोटाळ्यावर आधारित आहे. यात सुदेव नायर एका तपासनीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध असेल.