INSIDE VIDEO : जहीर खान व सागरिका घाटगेच्या ग्रॅण्ड रिसेप्शनमध्ये विराट व अनुष्काचा जलवा! विराटने केला धम्माल डान्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 15:36 IST2017-11-28T09:57:19+5:302017-11-28T15:36:00+5:30
क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. पण काल रात्री त्यांच्या रिसेप्शनची ग्रॅण्ड पार्टी रंगली. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली.
1.jpg)
INSIDE VIDEO : जहीर खान व सागरिका घाटगेच्या ग्रॅण्ड रिसेप्शनमध्ये विराट व अनुष्काचा जलवा! विराटने केला धम्माल डान्स!!
क रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. पण काल रात्री त्यांच्या रिसेप्शनची ग्रॅण्ड पार्टी रंगली. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली.
![]()
![]()
२३ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकेलेले सागरिका आणि जहीर यांनी २६ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या मित्र मंडळींसाठी कॉकटेल पाटीचे आयोजन केले होते. यानंतर २७ नोव्हेंबर रोजी कुलाब्याच्या ताज पॅलेसमध्ये या दोघांचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पाडले. यावेळी जहीरने ब्ल्यू रंगांचा सूट घातला होता तर सागरिकाने गोल्डन कलरचा लहंगा परिधान केला होता.
![]()
सागरिका व जहीर यांच्या रिसेप्शनमध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती विराट कोहली व अनुष्का शर्मा या लव्हबर्ड्सची उपस्थिती. ग्रे रंगाच्या सूटातील विराट आणि काळ्या व सिल्व्हर रंगाच्या लहंग्यातील अनुष्का अतिशय सुंदर दिसत होते. दोघांनीही सागरिका व जहीरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये धम्माल केली. या धम्माल मस्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सड्डी गली भुल हे गाणे वाजतेय आणि विराट, अनुष्का, जहीर, सागरिका सगळेच बेधान होऊन नाचताना दिसताहेत.
ALSO READ : SEE PICS : सागरिका घाटगे आणि जहीर खान यांनी रिसेप्शनपूर्वी अशी एन्जॉय केली पार्टी!
दीर्घकाळापासून विराट व अनुष्का एकमेकांना डेट करताहेत. अर्थात अद्यापही अनुष्काने हे नाते जाहिर केलेले नाही. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. सागरिका व जहीरच्या वेडिंग रिसेप्शनमध्येही दोघे एकत्र दिसलेत. हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे.
सागरिका आणि जहीरची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिली होती. दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते. मात्र याची भनकही कोणाला लागली नव्हती. त्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहण्यात आले आणि यांच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाली होती. युवराज आणि हेजलच्या लग्न समारंभात जहीर आणि सागरिका एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चचेर्ला उधाण आले होते. अखेर या चर्चांचा जहीरने पूर्णविराम देत तो सागरिकासोबत एंगेज असल्याचे जाहिर केले होते. आता या सुंदर जोडप्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊ यात आणि या जोडप्याच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो पाहुयात!