Inside House Photo: सोनाली बेंद्रेच्या आलिशान आणि शानदार घराचं इंटेरिअर या सुपरस्टारच्या एक्स पत्नीने केले डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 14:35 IST2018-01-08T09:05:44+5:302018-01-08T14:35:44+5:30

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. आपलं सौंदर्य, अदा, नृत्य आणि अभिनयानं या मराठमोळ्या मुलीनं हिंदी ...

Inside House Photo: Sonali Bendre's luxurious house is the interior of this superstar's X-wife made Design | Inside House Photo: सोनाली बेंद्रेच्या आलिशान आणि शानदार घराचं इंटेरिअर या सुपरस्टारच्या एक्स पत्नीने केले डिझाईन

Inside House Photo: सोनाली बेंद्रेच्या आलिशान आणि शानदार घराचं इंटेरिअर या सुपरस्टारच्या एक्स पत्नीने केले डिझाईन

्वदच्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. आपलं सौंदर्य, अदा, नृत्य आणि अभिनयानं या मराठमोळ्या मुलीनं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. टक्कर, दिलजले, सपूत, तराजू, सरफरोश अशा विविध सिनेमात सोनाली बेंद्रे हिने साकारलेल्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. सध्या ती सिनेमांपासून दूर असली तरी विविध पार्ट्या, इव्हेंट्स, जाहिरातींमधून तिचं रसिकांना  दर्शन होतं. नुकतंच वयाची चाळीशी पूर्ण करणारी सोनाली तिच्या संसारात बिझी आहे. निर्माता गोल्डी बहेलसह लग्नबंधनात अडकलेली सोनाली एका मुलाची आई आहे.मुंबईत जुहू या पॉश परिसरात सोनाली आणि गोल्डी बहेल यांचे आलिशान आणि शानदार घर आहे. या घराची एक खास बात आहे.ही विशेष बाब म्हणजे या घराचे इंटेरिअर हृतिक रोशनची एक्स वाइफ आणि प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर सुझान खान हिने केले आहे. सुझान आणि सोनाली या जुन्या मैत्रिणी आहेत. याशिवाय सोनालीने तिच्या घरात अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले डेकोरेशन आयटम्स ठेवले आहेत. एक उत्तम अभिनेत्री असलेल्या सोनालीच्या जीवनाचा आणखी एक पैलू काही दिवसांपूर्वी समोर आला होता.  अभिनेत्रीसह ती एक लेखिकाही आहे. सोनाली बेंद्रेने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. शिवाय सोनालीला वाचनाची आवड आहे. त्यामुळे घरात तिने खास बुक शेल्फ तयार करुन घेतले आहे. सोनालीने तिच्या घराचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे.

Also Read:बॉलिवूडच्या ‘या' अभिनेत्रीवर कधी काळी सुनील शेट्टीचं होतं जीवापाड प्रेम?जाणून घ्या कोण आहे 'ती'

सोनाली बेंद्रेवर बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी भलताच लट्टू झाला होता. सिनेमात सुनील आणि सोनाली अनेकदा रोमान्स करताना दिसले. दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर चांगलीच रंगली. मात्र प्रत्यक्ष जीवनात सुनील आपल्या मनातली प्रेमाची गोष्ट सोनालीपुढे कधीच व्यक्त करु शकला नाही.सुनीलचं सोनालीवर जीवापाड प्रेम होतं असंही सांगितलं जातं.केवळ सुनीलच नाही तर सोनालीलाही बॉलिवूडचा हा अण्णा भावला होता. मात्र सुनील शेट्टीनं ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं, त्याआधीच तो लग्नबंधनात अडकला होता. सुनीलचं सोनालीवर इतकं प्रेम होतं की तो विवाहित नसता तर त्याने सोनालीशी लग्न केलं असतं ही बाब सुनीलचा खास मित्र आणि अभिनेता गोविंदानं सांगितली आहे. 

Web Title: Inside House Photo: Sonali Bendre's luxurious house is the interior of this superstar's X-wife made Design

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.