लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड्समध्ये नाच पंजाबन गाण्यावर थिरकली प्राजक्ता कोळी, मिळाला हा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 20:58 IST2023-02-22T20:52:32+5:302023-02-22T20:58:28+5:30
प्राजक्ता ही 29 वर्षीय कंटेंट क्रिएटर असून तिचे यूट्यूबवर 68 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 74 लाख आहे

लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड्समध्ये नाच पंजाबन गाण्यावर थिरकली प्राजक्ता कोळी, मिळाला हा पुरस्कार
लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला मोठ्या दिमाखात पार पडले. या पुरस्कार सोहळ्यात डिजिटल माध्यमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला आहे. लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड्ची विजेती ठरली प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी(Prajakta Koli). प्राजक्ता नाच पंजाबन या गाण्यावर थिरकली.
प्राजक्ताला मोस्टली सॅन (Mostly Sane) म्हणून ओळखले जातात. प्राजक्ता ही 29 वर्षीय कंटेंट क्रिएटर असून तिचे यूट्यूबवर 68 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 74 लाखा आहे. प्राजक्ताने आपल्या कॉन्टेंटची सुरुवात शॉर्ट स्किट्स (प्ले) पासून केली. मात्र, हळूहळू तिचे चॅनल वाढत गेले आणि तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि सेलिब्रिटींच्या मुलाखतीही सुरू केल्या.
प्राजक्ताने नेटफ्लिक्सची सीरिज मिसमॅच्ड आणि अलीकडच्या जुग जुग जिओ या बॉलीवूड चित्रपटात काम केले. तिने फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 मध्येही आपले स्थान बनवले आहे. 2017 मध्ये ओबामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी निमंत्रण मिळाले होते.