विनयभंग, शोषणाचे आरोप असलेले भारतीय सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:49 IST2016-01-16T01:19:00+5:302016-02-06T11:49:27+5:30

लैंगिक शोषण, विनयभंग, कास्टिंग काउच, मुलांचे शोषण हे प्रकार ग्लॅमरवर आधारित जवळपास सर्वच उद्योगात सर्रास चालणारे प्रकार आहेत. भारतलाही ...

Indian celebrities accused of molestation, exploitation | विनयभंग, शोषणाचे आरोप असलेले भारतीय सेलिब्रेटी

विनयभंग, शोषणाचे आरोप असलेले भारतीय सेलिब्रेटी

ंगिक शोषण, विनयभंग, कास्टिंग काउच, मुलांचे शोषण हे प्रकार ग्लॅमरवर आधारित जवळपास सर्वच उद्योगात सर्रास चालणारे प्रकार आहेत. भारतलाही अशे प्रकारांमध्ये काही नवीन नवीन नाहीत. भारतातील चित्रपट व टीव्ही उद्योगात कास्टींग काउच झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अलीकडच्या काळांमध्ये भारतात समोर आलेली अशीच काही प्रकरणे पाहूया.
1.खालीद सिद्दीकी - राहत
'महारक्षक आर्यन' आणि 'ड्रीम गर्ल' फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता खालीद सिद्दीकीवर खुद्द त्याच्या पत्नीनेच विनयभंगाचा आरोप केला होता.41 वर्षीय खालीदला खार पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला अट केली होती. खालीदच्या पत्नीने एकदा रात्री 2 वाजता त्याची कार त्याच्या मैत्रिणीच्या इमारतीमध्ये पार्क केलेली बघितली यातूनच त्यांच्यात वाद झाला. सुरक्षारक्षकासमोर तिचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत केली आणि सकाळी 8.30 च्या सुमारास खालीदला अटक झाली. 2. सुभाष कपूर- गीतिका त्यागी
या प्रक रणात विनयभंग केल्याचे मान्य करून नंतर माफी मागणे हा प्रकार गुप्तपणे कॅमेरात रेकॉर्ड करण्यात आला होता. एप्रिलमध्ये ही घटना घडली होती. 'जॉली एलएलबी' फेम चित्रपट दिग्दर्शक सुभाष कपूर यांना मॉडेल, अभिनेत्री गीतिका त्यागी हिच्या विनयभंगाच्या आराोपानंतर विनयभंगाच्या आरोपखाली अटक करण्यात आली होती. गीतिकाने या संबंधी एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता.

Web Title: Indian celebrities accused of molestation, exploitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.