Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो-
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:41 IST2025-05-09T10:40:57+5:302025-05-09T10:41:56+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत

Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो-
आज रात्रभर भारत - पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण होतं. पाकिस्ताननेभारतावर केलेला ड्रोन हल्ला भारतीय सैन्याने परतवून लावला. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानच्या महत्वाच्या भागांवर हल्ला चढवला. रात्रभर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण होतं. या परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीही रात्रभर जागे होते. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला.
रितेश देशमुखची पोस्ट
रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलीय की, "आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना माझा सलाम. आपले सैनिक आपल्याला सुरक्षा देण्यासाठी निडरपणे आणि बेधडकपणे शत्रूंचा सामना करत आहेत. इंडियन आर्मी जिंदाबाद." याशिवाय रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीयाने सुद्धा भारतीय सैन्याची गौरवगाथा मांडणारी पोस्ट लिहिली आहे. जिनिलीया लिहिते, "भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला आणि हुशारीला सलाम. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी आम्ही प्रार्थना करतो."
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पोस्ट
अनिल कपूर यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला. "आम्हाला सुरक्षा देणाऱ्या भारतीय सेनेतील सर्व बहादूर आणि धाडसी पुरुषांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो."
कंगना राणौतने भारताने रात्री काल हल्ला केला त्याचा व्हिडीओ शेअर करुन भारतीय सेनेला सलाम केला.
#moodpic.twitter.com/IWWttpA5b7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 8, 2025
मानुषी छिल्लरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितलंय की, "संरक्षण मंत्रालयात ३ दशके काम करणाऱ्या एका डॉक्टरची मुलगी आणि एका लष्करी अधिकाऱ्याची भाची म्हणून, आपल्या सशस्त्र दलांनी देशाची सेवा करण्यासाठी जे बलिदान दिले आहे त्याबद्दल मला अत्यंत आदर आणि कौतुक आहे. नेहमीच आमचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद.
जयहिंद"
अशाप्रकारे भारतीय सेनेचं बॉलिवूड कलाकारांनी कौतुक केलं आहे. काल कराची - पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या सीमाभागातील शहरांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत ड्रोन, मिसाईल हल्ले हाणून पाडले. त्यातच भारतीय नौदलानेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. भारतीय युद्धनौका INS विक्रांतने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्याची कराची बंदरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.