संपता संपेना प्रभासच्या अडचणी, आता सलारच्या टीमसोबत घडली ही मोठी दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:35 IST2021-02-05T17:35:00+5:302021-02-05T17:35:00+5:30
साउथ चित्रपटापासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारा अभिनेता प्रभासच्या अडचणी संपायचे काही नाव घेत नाही.

संपता संपेना प्रभासच्या अडचणी, आता सलारच्या टीमसोबत घडली ही मोठी दुर्घटना
साउथ चित्रपटापासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारा अभिनेता प्रभासच्या अडचणी संपायचे काही नाव घेत नाही. त्याचा आगामी 'आदिपुरुष'च्या शूटिंग दरम्यान सेटवर आग लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. ही घटना ताजी असतानाच प्रभासच्या आणखीन एका चित्रपटाच्या टिमसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. 'सलार' चित्रपटाच्या टिमचा अपघात झाला असून टिममधील सदस्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या टिममध्ये नेमके कोण होते त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत.
ही टीम शूटिंग संपवून हॉटेलवर परत येत होती. त्याचवेळी व्हॅनचा अपघात झाला आहे. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तेलंगण गोदावरीखानी येथे हा अपघात झाला. सैफ अली खान आणि प्रभासचा चित्रपट आदिपुरुषची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आला आहे.
हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचे बजेट ४०० कोटी रुपये आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच वादांनंतर चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे.
मात्र, शूटिंग दरम्यानच सेटवर आग लागली होती. दिग्दर्शक ओम राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम सुरक्षित आहेत. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी सेटवर प्रभास आणि सैफ शूटवर नव्हते. आग लागल्यानंतर काही मिनिटांतचअग्निशमन दलाने येऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली.