५४ व्या इफ्फीचे गोव्यात उद्घाटन; माधुरीचा दिलखेचक परफॉर्मन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 05:59 IST2023-11-21T05:59:21+5:302023-11-21T05:59:37+5:30
माधुरी दीक्षित, नुसरत भरुचा यांचे दिलखेचक परफॉर्मन्स

५४ व्या इफ्फीचे गोव्यात उद्घाटन; माधुरीचा दिलखेचक परफॉर्मन्स
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि नुसरत भरुचा यांच्या रंगारंग परफॉर्मन्सने सोमवारी ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिमाखात व जल्लोषात उद्घाटन झाले. औपचारिक कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्याहस्ते झाले.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, दिग्दर्शक करण जोहर, गोवा मनोरंजन संस्थेच्या अध्यक्ष आमदार डिलायला लोबो, सभापती रमेश तवडकर, मंत्री गोविंद गावडे, सुभाष फळदेसाई, तसेच आमदार, राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. अभिनेता अपारशक्ती खुराना आणि अभिनेत्री करिश्मा तन्ना यांनी सूत्रसंचालन केले. गोवा मनोरंजन संस्थेने फिल्म सिटीसाठी प्रस्ताव मांडला असून लवकरच गोव्यात फिल्म सिटी होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.