इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:22 IST2019-03-27T12:20:41+5:302019-03-27T12:22:33+5:30

लव्ह आज कल आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Imtiaz Ali's film starring Sara Ali Khan and Kartik Aaryan gets a title Aaj Kal | इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव

इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव

ठळक मुद्देया चित्रपटाचे नाव काय असणार याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते. पण या चित्रपटाचे नाव आज कल असणार असल्याचे वृत्त नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

लव्ह आज कल या चित्रपटात आपल्याला दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात ऋषी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट झाला होता. तसेच या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटाचा रिमेक दाक्षिणात्य भाषांमध्ये बनवण्यात आला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

फिल्मफेअर या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत खुद्द इम्तियाज अलीने लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करत असल्याचे म्हटले होते. पण हा चित्रपट लव्ह आज कलचा सिक्वल आहे याची अधिकृत घोषणा अद्याप तरी टीमकडून करण्यात आलेली नाहीये. या चित्रपटाचे नाव काय असणार याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते. पण या चित्रपटाचे नाव आज कल असणार असल्याचे वृत्त नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

लव्ह आज काल या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले होते आणि या चित्रपटाच्या सिक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा देखील इम्तियाजनेच सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरू होते. या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो देखील या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण आता दिल्लीतील चित्रीकरण संपले असून ही गोष्ट सारानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या फॅन्सना सांगितली होती. 

इम्तियाजच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहाण्यास त्याचे फॅन्स उत्सुक असल्याचे ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

आज कल हा चित्रपट 2020 च्या व्हॅलेन्टाइन डे ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Imtiaz Ali's film starring Sara Ali Khan and Kartik Aaryan gets a title Aaj Kal