​इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटांच्या पटकथा वाचता येणार आॅनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 21:46 IST2017-02-07T16:16:32+5:302017-02-07T21:46:32+5:30

बॉलिवूडमधील आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकापैकी एक असलेल्या इम्तियाज अली आपल्या चित्रपटाच्या पटकथा आॅनलाईन वाचनासाठी उपलब्ध करून देणार आहे. यामाध्यमातून ...

Imtiaz Ali directs the screenplay of the films can be read online | ​इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटांच्या पटकथा वाचता येणार आॅनलाईन

​इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटांच्या पटकथा वाचता येणार आॅनलाईन

लिवूडमधील आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकापैकी एक असलेल्या इम्तियाज अली आपल्या चित्रपटाच्या पटकथा आॅनलाईन वाचनासाठी उपलब्ध करून देणार आहे. यामाध्यमातून इम्तियाज अलीच्या जब वी मेट, हायवे व तमाशा यासारख्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट या क्षेत्रात येण्यास उत्सुक व विद्यार्थी व चाहत्यांना आॅनलाईन वाचता येणार आहे. 

चित्रपटाचा आधार त्याची पटकथा किंवा स्क्रिप्ट मानली जाते. याची कल्पना यावी यासाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याचे इम्तियाज याने सांगितले. इम्तियाज म्हणाला, मी आपल्या चित्रपटाची स्क्रिप्ट एका विशेष पद्धतीनुसार लिहीत नाही. माझ्या स्क्रिप्ट अशा असतात की मी नोट्स काढत आहे. स्क्रिप्टचे वाचन करणे हे दिग्दर्शकाचे महत्त्वाचे काम आहे. कथा आणि पडदा यामधील अंतर म्हणजे दिग्दर्शक, मी स्वत: चित्रपटाची पटकथा लिहिताना कोणत्याच पद्धतीचा वापर करीत नाही. मी दिग्दर्शित केलेल्या बहुतांश चित्रपटाच्या स्क्रिप्ट मी स्वत: लिहील्या आहेत. यामुळे माझ्या स्क्रिप्ट या माझ्यासाठी नोट्स प्रमाणे आहेत. 



इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट आॅनलाईन ‘फिल्म कॅम्पेनियन’वर उपलब्ध असून यास डाउनलोड करता येणार आहे. चित्रपट रसिकांना त्यांच्या आवडते चित्रपट कागदावर कसे दिसतात हे पाहायला मिळणार आहे. फिल्म कॅम्पेनियनचे संपादक संस्थापक व चित्रपट समीक्षक अनुपमा चोपडा यांनी आयएएनएसला याबद्दलची माहिती दिली. अनुपमा चोपडा म्हणाल्या, चित्रपटाच्या पटकथा आपले मनोरंजन व ज्ञान प्रदान करतात. फेब्रुवारी महिन्यात आम्ही इम्तियाज अलीच्या कामाचा व चित्रपटाचा उत्सव साजरा करीत आहोत. त्याने आधुनिक काळातील प्रेमाला तमाशा, जब वी मेट, रॉक स्टार आणि हायवे सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून सर्र्वांच्या समोर आणले आहे. 

Web Title: Imtiaz Ali directs the screenplay of the films can be read online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.