इमरान करणार कॅन्सररूग्णांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:18 IST2016-04-24T12:48:31+5:302016-04-24T18:18:31+5:30
इमरान हाश्मी सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘अजहर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याने नुकतेच त्याचे पहिले पुस्तक ‘द किस आॅफ ...

इमरान करणार कॅन्सररूग्णांना मदत
इ रान हाश्मी सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘अजहर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याने नुकतेच त्याचे पहिले पुस्तक ‘द किस आॅफ लाईफ - हाऊ अ सुपरहिरो अॅण्ड माय सन डिफिटेड कँन्सर’ चे लाँचिंग केले आहे.
त्याच्या या पुस्तकाच्या विक्रीतून जी रक्कम येईल ती तो कॅन्सर ग्रस्तांना देणार आहे. ज्या कॅन्सरपीडित रूग्णांना त्यांचा खर्च करता येत नाही त्यांच्यासाठी तो मदतीचा हात देत आहे.
त्याने अगोदरच ठरवले होते की, तो एकतर सामाजिक संस्थांना किंवा हॉस्पिटलांना ही रक्कम देईल. त्याचा सहा वर्षांचा मुलगा अयान याला २०१४ मध्ये कँसर झाल्याचे उघडकीस आले. तो बरा झाल्यानंतर इमरानने या विषयावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला.