इम्रान हाश्मीचे पुस्तक येतेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:54 IST2016-01-16T01:17:20+5:302016-02-09T04:54:39+5:30
त्याचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे आणि तो गेली २ वर्षे जीवघेण्या कॅन्सरशी लढतोय. सुदैव एवढेच, की हा कॅन्सर ...

इम्रान हाश्मीचे पुस्तक येतेय
्याचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे आणि तो गेली २ वर्षे जीवघेण्या कॅन्सरशी लढतोय. सुदैव एवढेच, की हा कॅन्सर फस्र्ट स्टेजमध्ये आहे. तरीही गेली दोन वर्षे एक बाप म्हणून इम्रानला आपल्या मुलासाठी जे काही करता येणं शक्य आहे ते तो करतोय. त्याची ही दोन वर्षांची लढाई त्याने शब्दबद्ध केलीय. एका प्रकाशकाकडे त्याने ती देऊनही टाकली आहे. कॅन्सरविरुद्धच्या लढाईचे त्याचे हे पुस्तक पुढील वर्षी प्रकाशित होईल. या पुस्तकाबाबत तो खूपच आशावादी आणि उत्सुकही आहे. नुकतीच त्याने या पुस्तकाबाबतची माहिती त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. इम्रान सध्या ३६ वर्षांचा असून ९ वर्षांपूर्वी परवीन सहानीशी विवाहबद्ध झाला होता.