इमरान हाश्मी निर्माता होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:15 IST2016-06-16T07:25:13+5:302016-06-16T13:15:53+5:30
यशस्वी अभिनेता व ‘किस आॅफ द लाईफ’ या पुस्तकाचा लेखक म्हणून ओळख मिळविणारा इमरान हाश्मी आता निर्माता होणार असल्याचे ...

इमरान हाश्मी निर्माता होणार!
‘लोकांमधील नायक’ अशी बिरुदावली मिळविणाºया इमरानचा ‘अझहर’ हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने मल्टिप्लेक्समधून ८५ टक्के कमाई केली आहे. समिक्षकांनी या चित्रपटातील इमरानच्या भूमिकेची प्रसंशा केली. माजी क्रिकेटपटू व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी त्याचे कौतुक होत असताना त्याने याचे श्रेय दिग्दर्शक टोनी डिसुझाला दिले आहे.
‘इमरान हाश्मी फिल्मस्’च्या पहिल्या चित्रपटासाठी दिग्दर्शक टोनी डिसुझा उत्सुक असल्याने इमरानला आनंद झाला आहे. विशेष म्हणजे यासाठी स्वत: टोनीने इमरानशी सरळ संपर्क साधला आहे. हा नवा चित्रपट इमरान हाश्मी फिल्मस् व टोनी डिसुझा व नितीनच्या आॅडबॉल मोशन पिक्चर्सचा व्हेंचर असणार आहे. इमरान व टोनी एकत्र आल्याने प्रेक्षकांना काही तरी नवे देण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत.