कॅटरिनाला पटले सोशल मीडियाचे महत्त्व!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 16:14 IST2016-07-02T10:44:18+5:302016-07-02T16:14:18+5:30
बहुतांश बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. मात्र कॅटरिना कैफ आजपर्यंत या गर्दीत सामील झालेली नव्हती. पण आता कॅटरिनाच्या ...

कॅटरिनाला पटले सोशल मीडियाचे महत्त्व!!
ब ुतांश बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. मात्र कॅटरिना कैफ आजपर्यंत या गर्दीत सामील झालेली नव्हती. पण आता कॅटरिनाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. ती म्हणजे कॅटरिना लवकरच फेसबुक, टिष्ट्वटर व इंस्टाग्रामवर सक्रिय होणार आहे. कॅटरिनाला स्वत:ची पर्सनल लाइफ इतरांशी शेअर करणे आवडत नाही. त्याचमुळे आजपर्यंत कॅटरिना सोशल मीडियापासून दूर राहिली होती. पण सोशल मीडिया खुलेपणाचे विचार मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, हे आताश: कॅटरिनाला पटले आहे. त्याचमुळे सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा निर्णय तिने घेतला आहे. या व्यासपीठावरून कॅटरिना अर्थातच तिचा आगामी सिनेमा ‘बार बार देखो’चे प्रमोशन करणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे. कॅटरिना स्वत:चे सोशल अकाऊंट स्वत:च हँडल करणार आहे. त्यामुळेच कॅटरिना सोशल मीडियावर कधी अॅक्टिव्ह होते, त्याची प्रतीक्षा करूयात!!