"मोठा सिनेमा देतो, कॉम्प्रोमाइज कर..", रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडने केला कास्टिंग काउचचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 11:03 IST2025-05-26T11:03:31+5:302025-05-26T11:03:55+5:30
सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काउच खूप सामान्य आहे. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

"मोठा सिनेमा देतो, कॉम्प्रोमाइज कर..", रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडने केला कास्टिंग काउचचा सामना
सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काउच खूप सामान्य आहे. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या यादीत मल्लिका शेरावत ते अंकिता लोखंडेच्या नावाचा समावेश आहे. या यादीत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची रुमर्ड गर्लफ्रेंड असलेल्या अभिनेत्रीचेही नाव आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई (Prachi Desai), जिने २००८ मध्ये 'रॉक ऑन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या अभिनेत्रीने एकदा तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल सांगितले होते आणि एका दिग्दर्शकाच्या घाणेरड्या मागणीचा खुलासा केला होता. मात्र, प्राचीने तो चित्रपट नाकारला होता आणि त्याला नकार दिला होता.
बॉलिवूड बबलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत प्राची देसाई म्हणाली होती की, तिला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती आणि तिला तडजोड करण्यास सांगण्यात आले होते. ती म्हणाली होती की, मला एका मोठ्या चित्रपटात काम करण्यासाठी थेट ऑफर देण्यात आली होती, पण मी ती नाकारली. त्या दिग्दर्शकाने मला फोन केल्यानंतर, नकार दिल्यानंतरही मी म्हणाले की, मला तुमच्या चित्रपटात इंटरेस्ट नाही.
रोहित शेट्टीशी जोडलं गेलेलं अभिनेत्रीचं नाव
प्राची देसाईचे नाव एकेकाळी तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे दिग्दर्शक रोहित शेट्टीशी जोडले गेले होते. 'बोल बच्चन'च्या शूटिंगदरम्यान ते जवळ आले होते असे सांगितले जाते. दोघेही एकत्र राहत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमुळे रोहित त्याची पत्नी माया शेट्टीला सोडून जात असल्याचा दावाही करण्यात आला होता. नंतर त्याने त्याच्या पत्नीशी समेट केला, त्यानंतर रोहितचे प्राचीशी असलेले नाते संपले. परंततु, दोघांनीही या अफवांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.
वर्कफ्रंट
प्राची देसाईच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने 'रॉक ऑन' नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ती 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'बोल बच्चन', 'आय, मी अँड करण' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.