‘मी अपघाताने कलाकार बनलो’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 12:53 IST2016-07-22T07:23:24+5:302016-07-22T12:53:24+5:30
दिलजीत दोसंघ याने ‘उडता पंजाब’ मध्ये काम केले आणि त्याला बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळाली. त्याच्या भूमिकेचे खुप कौतुक बॉलीवूडमधील कलाकारांकडून ...

‘मी अपघाताने कलाकार बनलो’
िलजीत दोसंघ याने ‘उडता पंजाब’ मध्ये काम केले आणि त्याला बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळाली. त्याच्या भूमिकेचे खुप कौतुक बॉलीवूडमधील कलाकारांकडून झाले. आता तो ‘फिलौरी’ साठी काम करतोय. पंजाबी चित्रपटसृष्टीत तो उत्तम अभिनेता आणि गायक आहे. तरीही केवळ प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये गुंतून न पडता त्याने बॉलीवूडमध्ये अभिनय करण्याचा निर्णय घेतला.
पण त्याच्या या निर्णयाविषयी बोलताना तो म्हणतो,‘ एखाद्या चित्रपटासाठी जेव्हा माझी निवड केली जाते तेव्हा मला फारच आनंद होतो. ते मला एक कलाकार म्हणून खुपच गंभीरपणे पाहतात. पण, अपघातानेच कलाकार बनलोय हे मला आवर्जून सांगावे लागेल. मला चित्रपटात गायला आवडते. पण, मी एखाद्या चित्रपटात गायलाच पाहिजे असा माझा अट्टाहास कधीच नसतो.
पंजाबी चित्रपटात गायल्याने आमच्या निर्मात्यांचा पैसा वाचतो म्हणून मी एखादे गाणे गातो. पण, प्रत्येकवेळी मी गाणे गात नाही. मी माझ्यासाठी गायन केले तरी खुप आहे. मला जगासमोर काहीही सिद्ध करावयाचे नाही.’