रोशन यांच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 11:16 IST2016-07-14T05:46:10+5:302016-07-14T11:16:10+5:30

प्रसिद्ध संगीतकार रोशन यांचा आज जन्मदिवस. रोशन यांच्या अनेक गाण्यांनी १९४९ ते १९६७ काळात प्रेक्षकांना भुरळ घातली. अभिनेते हृतिक ...

Illuminate Roshan's memories | रोशन यांच्या आठवणींना उजाळा

रोशन यांच्या आठवणींना उजाळा

ir="ltr">प्रसिद्ध संगीतकार रोशन यांचा आज जन्मदिवस. रोशन यांच्या अनेक गाण्यांनी १९४९ ते १९६७ काळात प्रेक्षकांना भुरळ घातली. अभिनेते हृतिक रोशनचे रोशन हे आजोबा. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

१४ जुलै १९१७ हा ज्येष्ठ संगीतकार रोशन यांचा जन्मदिन.
लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून रोशन यांनी संपूर्ण भारत दौरा केला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर गेले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने त्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर लखनऊच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. बडोदा रेडिओ स्टेशनवर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले.
१९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्यावेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने केदार शर्मा यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशनला दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन यांची गाणी १९४९ ते १९६७ या काळात खूप गाजली. त्यांनी आपल्या पहिल्या १९४९ ते १९६० काळात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया अशा चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि १९६० ते १९६७ काळात मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग या चित्रपटांतू ते जाणवते. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपटही या काळात आले.
नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे  तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात.  इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे ते निवडत असत. "त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावे प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशनने ५२ गीतकारांबरोबर काम केले.
रोशन यांचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.

-संजीव वेलणकर

Web Title: Illuminate Roshan's memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.